आॅनलाइन लोकमतधुळे : आर्थिकदृट्या दुर्बल तसेच वंचीत घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आरटीई अंतर्गत बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली. धुळे जिल्ह्यात २०१३ पासून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शाळा व विद्यार्थी प्रवेशाच्या संख्येत दरवर्षी वाढ करण्यात आलेली आहे. परंतु गेल्या पाच वर्षात एकाहीवर्षी १०० टक्के प्रवेश झालेले नाहीत.धुळे जिल्ह्यात आरटीई मोफत प्रवेशाची सुरवात २०१३ पासून झाली. २०१३-१४ या वर्षासाठी जिल्ह्यातील ३० शाळांमध्ये १ हजार ६८ विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येणार होता. मात्र पहिल्या वर्षी फक्त २६७ विद्यार्थ्यांनीच मोफत प्रवेशाचा लाभ घेतला. यापैकी ८०१ विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात ४१ शाळांमध्ये १ हजार ६४० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेता येणार होता. प्रत्यक्षात फक्त ४१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावर्षी तब्बल १२३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. २०१५-१६ या वर्षात समाधानकारक स्थिती होती. यावर्षी ६८ शाळांमध्ये ७०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची संधी दिली होती. त्यापैकी ६९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.म्हणजे यावर्षी फक्त सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. २०१६-१७ या वर्षात शाळांची संख्या थोडी घटली. यावर्षी ६० शाळांमध्ये ९९५ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची संधी होती. त्यापैकी ४९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावर्षीही ४९६ विद्यार्थी प्रवेशापासून दूरच राहिले. २०१७-१८ यावर्षात ८१ शाळांमध्ये ११३४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली होती. मात्र त्यापैकी फक्त ८२१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. तर ३१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाच नाही.याचाच अर्थ गेल्या पाच वर्षात शंभरटक्के विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतलेला नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.प्रवेश पूर्ण न होण्याची अनेक कारणेदरवर्षी अनेक पालक आपल्या पाल्यासाठी मोफत प्रवेशासाठी अर्ज करीत असतात. मात्र पाल्याची निवड झाली तरी ते प्रवेश घेण्यासाठी शाळेपर्यंत जातच नाही. काहीजण कागदपत्रांची आवश्यक ती पूर्तता करीत नाही. काहीजण वैय्यक्तीक कारणास्तव पाल्याचा प्रवेश घेत नाही अशा नानाविध कारणामुळे दरवर्षी जागा रिक्त राहतात. या रिक्त जागा नंतर भरल्या जात नाही. त्यामुळे कमी प्रवेशितांची संख्या जास्त दिसते, असेही सांगण्यात आले.शाळशंची रक्कम बॅक खात्यात जमाआरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फी शासनच शाळांना अदा करीत असते. त्याअनुषंगाने २०१३ ते २०१६ या कालावधीतील तब्बल ३ कोटी ५२ लाख ९६ हजार ७८८ रूपयांची रक्कम सीएमडी प्रणालीद्वारे त्या-त्या शाळेच्या बॅँक खात्यावर १०० टक्के जमा करण्यात आलेली आहे. याासाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी शासनाशी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही संपूर्ण रक्कम जमा होऊ शकलेली आहे.२०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील १ कोटी ६ लाख ७४ हजार ६६५ रूपयांचे अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. त्याचे बजेट शासनाकडे पाठविण्यात आलेले आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात आरटीईचे मोफत प्रवेश पूर्ण झालेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:35 AM
शाळांच्या संख्येत दरवर्षी वाढ, पालकांचीही अनास्था
ठळक मुद्देजिल्ह्यात २०१३ पासून आरटीई मोफत प्रवेशास सुरवात गेल्या पाचवर्षात शाळांच्या संख्येत वाढ झालीप्रवेश पूर्ण झालेलेच नाहीत