धुळे : कविवर्य प्रा़ पुरुषोत्तम पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल़े या वेळी त्यांच्या आप्तेष्टांसह मित्र परिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती़ कविवर्य प्रा़ पुरुषोत्तम पाटील अर्थात पुपाजी यांचे सोमवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास निवासस्थानी निधन झाल़े अनेकांनी त्यांच्या वाडीभोकर रोडवरील विजय पोलीस कॉलनीतील निवासस्थानी भेट देत श्रद्धांजली वाहिली. मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास फुलांनी सजविलेल्या रामरथातून त्यांची अंत्ययात्रा निघाली़ एकवीरादेवी मंदिराजवळच्या स्मशानभूमीत त्यांचा मुलगा प्रकाश यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवावर अगिAसंस्कार करण्यात आल़े या वेळी प्रसिद्ध निसर्गकवी पद्मश्री ना़ धों़ महानोर, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, डॉ़ हेमंत देशमुख, भूपेंद्र लहामगे, डॉ़ कृष्णा पोतदार, कृष्णा पाटील, प्रा़ विलास चव्हाण, दिलीप साळुंखे, सुभाष अहिरे, रत्नाकर वाघ, रणजीत राजपूत, शंकरराव थोरात, डॉ़ दिलीप पाटील, प्राचार्य पी़एच़ पवार, गो़तु़ पाटील, कमलाकर देसले, खलील मोमीन, विद्याविलास पाठक, भास्करराव चव्हाण, अशोक सोनवणे, प्ऱअ़ पुराणिक, मधुकर रोकडे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत़े मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली़़़ज्येष्ठ कवी पुरुषोत्तम पाटील यांच्या निधनामुळे नवकवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा व्रतस्थ साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली़ श्रेष्ठ साहित्यिक असलेले प्रा़ पाटील यांनी नियतकालिकांची संख्या कमी होत असताना केवळ काव्य आणि काव्यसमीक्षा यांनाच वाहिलेले कवितारती हे नियतकालिक 1985 पासून प्रकाशित करून निष्ठेने चालविल़े
पुरुषोत्तम पाटील यांना अखेरचा निरोप!
By admin | Published: January 18, 2017 12:03 AM