लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे. शेतकºयांसह सर्वांनाच लाटीपाडा धरण कधी भरणार, याची उत्सुकता होती. दरम्यान, गेल्या ८ ते १० दिवसांपासून संततधार सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत होती. अखेर बुधवारी धरण पूर्ण क्षमतेने भरुन दुपारी २ वाजेच्या सुमारास ‘ओव्हरफ्लो’ झाले.साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणाची क्षमता १२५८ एमसीएफटी आहे. परिसरासाठी हे धरण खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे लाटीपाडा धरण कधी भरणार, याकडे शेतकºयांसह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून होते.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत होती.अखेर बुधवारी धरण शंभर टक्के भरुन दुपारी २ वाजेच्या सुमारास ‘ओव्हरफ्लो’ झाले. धरण भरल्यामुळे शेतकºयांची रब्बीची चिंता मिटली आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.संततधार पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहे. यामुळे लाटीपाडा धरणात अजून जलस्तर वाढता राहण्याची शक्यता आहे. यामुळे जल पातळीत वाढ झाली आहे. शेतातील विहिरी व स्थानिक नागरिकांच्या बोअरवेलच्या पाण्याची पातळीही वाढली आहे.साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्व प्रकल्प आता पाण्याने भरली आहेत. पिंपळनेर परिसरातील नागरिकांना यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे नागरिकांनी आता तरी पाण्याची बचत करावी व भविष्यात पाणी टिकेल याप्रमाणे वापरावे, अशी चर्चा होत आहे.
लाटीपाडा धरण ‘ओव्हरफ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 7:49 PM