आॅनलाईन न्यूज नेटवर्कधुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील दोन ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्यावर अचानक धाडी टाकल्या़ यात एकत्रित २ लाख ९४ हजार ८२० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून २२ जुगाºयांनाही ताब्यात घेण्यात आले आहे़ अचानक राबविलेल्या धडक मोहिमेमुळे जुगार खेळणाºयांचे धाबे दणाणले आहे़ मालेगाव रोडवर कारवाईशहरातील मालेगाव रोडवर असलेल्या आईस फॅक्टरीच्या आवारातील एका घरात बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला़ या ठिकाणी अवैधरित्या जुगाराचा अड्डा सुरु असल्याचे पोलिसांना दिसून आले़ छापा टाकत जुगाºयांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साधने व साहित्य, मोबाईल, घटनास्थळी मिळून आलेल्या दुचाकी असे एकूण २ लाख ६६ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ यावेळी शंकर गेंदालाल शिंदे (३९) रा़ विष्णू नगर, देवपूर धुळे, दिनेश अरविंद पाटील (२२) रा़ टेलिफोन कॉलनी देवपूर धुळे, सागर संजय जयस्वाल (२४) रा़ नेर ता़ धुळे, सलिम रज्जाक पिंजारी (४४) रा़ मौलवीगंज धुळे, चंद्रकांत उत्तम चौधरी (४५) रा़ पश्चिम हुडको चाळीसगाव रोड धुळे, गोकूळ केशव माळी (५२) रा़ सुभाष नगर जुने धुळे, उदेश जेरुभाई दरबार (५०) रा़ नवसारी यांना संशयावरुन अटक करण्यात आली़ धुळे शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत़ नटराज टॉकीज परिसरशहरातील नटराज टॉकीज समोरील वस्तीत एका पत्र्याच्या खोलीत चांदतारा सोशल क्रीडा मंडळाच्या नावाखाली झन्नामन्ना नावाचा जुगाराचा खेळ सुरु होता़ या ठिकाणी सुध्दा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला़ रोख रक्कम आणि जुगाराची साधने असा एकूण २८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी मुराद हुसेन मोहमद सुलेमान (४४) मच्छीबाजार आझादनगर धुळे, रज्जाक शहा हुसेन शहा (६०) कबिरगंज धुळे, आयुब बेग रशीदबेग (५२) रा़ धुळे, जाकीर हुसेन अन्सारी (४८) हाजीनगर वडजाई रोड धुळे, समीर अब्दुल रहिम समीर अहमद अन्सारी (३६) काझी प्लॉट धुळे, मोहमद इस्माईल मोहमद कलीम (३८) रा़ मनमाड जीन धुळे, शेख सलीम शेख युसुफ (२५) रा़ गल्ली नंबर ७ पारोळा रोड धुळे, नुरबेग अश्रफ बेग (३२) काझी प्लॉट धुळे, अकलाक अहमद मोहम्मद रफिक (३५) रा़ मौलवीगंज धुळे, अब्दुल रहिम कलीम अन्सारी (२६) रा़ इस्लामपुरा देवपूर धुळे, शकील कासीम अन्सारी (३९) रा़ गफ्फूर नगर काझी प्लॉट धुळे, अश्पाक अहमद शब्बीर अहमद (४०) रा़ आशियाना कॉलनी धुळे, शेख रशीद शेख लोटू (५५) रा़ काझी प्लॉट धुळे, जावीद शेख फकीर मोहमद (३४) रा़ तिरंगा चौक धुळे, शन्स तब्रेज मोहमद शाबान (५५) रा़ मौलवीगंज धुळे यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास आझादनगर पोलीस करीत आहे़
२२ जुगारींवर एलसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 5:34 PM
२ लाख ९४ हजार जप्त : मध्यरात्रीची धडक मोहीम
ठळक मुद्देमालेगाव परिसरात परिसरातून ७ जणांना घेतले ताब्यातनटराज टाकी परिसरातून १५ जणांना घेतले ताब्यातपोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड, सपकाळे, हेकॉ़ एच़ जी़ ठाकरे, एस