लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवपुरातील बिलाडी रोडवरील एकता नगर भागात मंगळवारी पहाटे छापा टाकला़ त्यात २०० गोण्यांमध्ये असलेला ३०० ते ४०० किलो भांग जप्त केला आहे़ त्याचे बाजारमूल्य लाखाच्या आसपास असेल असा प्राथमिक अंदाज आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली़ माहिती मिळताच एकता नगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला़ त्यात भांगच्या सुमारे २०० गोण्या आढळून आल्या असून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ बंद असलेले हे घर यशवंत दौलत सैंदाणे यांचे असल्याचे सांगण्यात आले़ यावेळी देवपूर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह अन्य अधिकारी आणि पोलिसांचे पथक हजर होते़ दरम्यान, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केली़ कारवाई करण्याची सूचना केली़
एलसीबीच्या पथकाने धुळ्यात भांग पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:13 PM
बिलाडी रोडवरील कारवाई : कॉलनी परिसरात खळबळ
ठळक मुद्देएलसीबीच्या छाप्यात भांग जप्तमुद्देमाल किती, कोणाचा याची तपासणी सुरुपोलीस अधीक्षक यांची घटनास्थळाला भेट