लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्रेह नगरातील क्रिस्टल टेक्नॉलॉजीतून संगणकासह अन्य इलेक्ट्रॉनिक्स साहित्य लंपास झाले होते़ शहर पोलिसात गुन्हाही दाखल झाला होता़ याप्रकरणी गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन मुद्देमालासह संशयित सागर प्रकाश शिरसाठ याला सोमवारी सायंकाळी उशिरा अटक केली़ शहरातील स्नेहनगरातील महापालिकेच्या जलतरण तलावजवळ असलेल्या खांडल विप्र भवनाजवळ क्रिस्टल टेक्नॉलॉजी नावाचे इन्स्टिट्युट आहे़ यात विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन परीक्षा घेतल्या जातात़ परिणामी संगणक, प्रिंटर यासह विविध संगणकाशी निगडीत साहित्य येथे आहे़ ४ मार्चच्या रात्रीतून संगणकासह इलेक्ट्रॉनिक्स साहित्य लंपास केले होते़ सकाळी नेहमीप्रमाणे केंद्र उघडल्यानंतर ही बाब लक्षात आली़ याप्रकरणी सुमीत सुभाष पाटील या तरुणाने धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़गुन्ह्याचा तपास सुरु असताना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र कापुरे, वसंत पाटील, मायूस सोनवणे, गौतम सपकाळे, नितीन मोहने, सचिन गोमसाळे, विजय सोनवणे, पंडीत मोरे, प्रभाकर बैसाणे, आरीफ शेख, उमेश पवार, चेतन कंखरे यांनी कारवाई केली़ शहरातील साक्री रोडवर सत्यसाईबाबा नगरात राहणारा सागर प्रकाश शिरसाठ याच्या घरात सोमवारी सायंकाळी उशिरा या पथकाने धाड टाकली असता चोरीचा मुद्देमाल आढळून आला़ ६४ हजार रुपये किंमतीचे ५ संगणक, ३ नग मॉनिटर, सीपीयू, ८ हजार रुपये किंमतीचे इन्व्हटर, ५ हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा असा एकूण ७७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला आहे़ यात संशयित सागर शिरसाठ यालाही अटक करण्यात आली आहे़
धुळ्यातून चोरीला गेलेले संगणक एलसीबीने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:33 PM
कारवाई : साक्री रोडवरुन संशयित ताब्यात
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईचोरीच्या संगणकासह संशयित जेरबंदसाक्री रोडवरील सत्यसाईबाबा नगरातील घटना