म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार परिसरात गेल्या महिन्याभरापासून बिबटयाचा संचार आहे. अनेकांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्याचा प्रत्यय शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आला. लवखोरा शेतशिवारांमध्ये वीजपुरवठा सुरु झाल्यावर शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय कल्पेश पाटील या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केला. परंतु आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी मदतीसाठी धावल्याने त्याचे प्राण वाचले.म्हसदी साक्री तालुक्यातील वसमार येथे लवखोरा शेतशिवारांमध्ये काल रात्री शनिवार साडेनऊ वाजता लाईट आल्यावर शेतशिवारांमध्ये वास्तव्य असलेले बाळू नेरे यांनी शनिवारी परिसरात वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर आपला १८ वर्षीय बारावीत शिकणारा मुलगा कल्पेशला शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार चालू करण्यास सांगितले. कल्पेश बाळू नेरे हा मोटार चालू करण्यासाठी गेला असता विहिरीजवळ असलेल्या बिबट्याने कल्पेशवर हल्ला केला. पण त्याने आरडाओरड केल्याने शेजारील शेतातील शेतकरी मदतीला धावून आल्याने बिबट्याने तेथून पळ काढला आणि सुदैवाने कल्पेशचे प्राण वाचले.वसमार परिसरामध्ये वारंवार बिबट्या धुमाकूळ घालत आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वन विभागाने पुन्हा गस्त घालावी, आणि बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करावे. वन विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा संचार व हैदोस सुरूच आहे. हुसकावून लावल्यानंतरही तो पुन्हा परत येत असल्याचे दिसून आले आहे. वन विभागातर्फे जागोजागी कॅमेरे बसवण्याची मागणीही होत आहे. दरम्या या घटनेमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकºयांनी कामे बंद केली आहेत.
वसमार येथे अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यावर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:24 PM