शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आठ वनक्षेत्रात बिबट्याचे ‘राज्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:14 PM

प्राणी गणना : गतवर्षी वन्यप्राणी १०९ तर पक्षी २०९; पक्ष्यांची नोंद, यंदा कोरोनाचा परिणाम

ठळक मुद्देबिबट्यांची संख्या जास्तबुध्दपौर्णिमेच्या रात्री जिल्हयातील ८ वनक्षेत्रात १३ बिबट्या आढळून आले दर चार वर्षानंतर प्राणी गणना केली जाते़ जिल्ह्यात २० ठिकाणी गणना

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात वन विभागाचे आठ वनपरिक्षेत्र आहे़ या वनक्षेत्रातील वेगवेगळ्या पाणवठ्यांवर दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख्य प्रकाशात वन्य प्राण्याची गणना केली जात़े़ गतवर्षी यात २०९ वन्यप्राणी, १०९ वन्य पक्षांची नोंद करण्यात आली होती. त्यात पक्ष्यांमध्ये मोरांची संख्या सर्वाधिक ४६ तर बिबटे ३० ते ३५ असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली़दरवर्षी बुध्दपौणिमेच्या दिवशी वन्य प्राण्याची गणना केली जाते़ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून काही ठिकाणी ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे वन्य प्राण्याची गणना केली होती़ काही वन्यप्राणी रात्री पाणी पिण्यासाठी रात्री पानवठयावर येत नाही़ त्यामुळे काहींची नोंदणी होत नाही़ त्यामुळे गत वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात कमी-अधिक नोंदणी होऊ शकते़ वन्यपप्राणी गणना करतांना प्राण्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेवून अभयारण्यातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांवर प्राणी प्रगणना केली जाते. दिवसा कृत्रिम पाणवठ्यांवर माणसांकडून हस्तक्षेप केला जातो. रात्री हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्रत्यक्ष दिसणाºया प्राण्यांची नोंद घेतली जाते. मात्र, सर्वच प्राणी दररोज पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत नाहीत. तसेच पाणवठ्यावर आलेल्या सर्वच प्राण्यांची नोंद घेता येत नाही. त्यामुळे सध्या इंडेक्स पद्धतीने प्राणी प्रगणना केली जात असल्याची माहिती देण्यात आली़जिल्ह्यात २० ठिकाणी गणनाधुळे तालुक्यात धाप धरण, गारबर्डी तलाव, हरण्यामाळ तलाव, तिन कोºया, चिंचवन तलाव, एडक्या धरण, नंदाळे, विन्याडोह, गरताड रोपवाटीका, साक्री तालुक्यात नायनदी, अक्कलपाडा, घाणेगाव धरण, शिरपूर तालुक्यातील बोराडी कक्ष ७७३, मालकातर, विरखेल धरण, लाटीपाडा धरण, शेलबारी धरण, ंिंशंदखेडा तालुक्यातील कर्ले, साळवे, खलाणे, शिंंदखेडा, चिमठाणा अशा विविध २० ठिकाणी वन्यप्राण्यांची गणना केली जाते़गत वर्षी अशी होती संख्यागत वर्षी १८ ते १९ जून २०१९ या कालावधीत बुध्द पौणिमेला निलगाय १६ , चिंकारा १५ , मोर २०, ससा २०, सायाळ ८, पाणकोंबड्या १०, बगळ े ३०, रानडुक्कर १५ असे एकूण धुळे तालुक्यात १३१ प्राणी आहेत़ लांडगे ३५, ससे १८, मोर ०५, घार ०४, पाणकोबड्या ८, बिबट्या ०२, तरस ३, रानडुक्कर १०, साक्री ८८ , कोल्हा ३ , लांडगे २, तितर ९, रानमांजर ३ , तरस ४ , बोराडी २१, बिबट्या ९ , चिकारा ११, अस्वल ४, रानडूक्कर ८ पिंपळनेर ३२ , बिबट्या २ , मोर २१, लांडगे ५ , कोल्हे ६ , ससे २, हरीण ५, शिंदखेडा ४१ तर जिल्ह्यात वन्यप्राणी २०९ पक्षी १०९ असे एकूण ३१८ वन्यप्राणी नोंद करण्यात आली आहे़ तर यंदा काही प्रमाणात भर पडू शकते़जिल्ह्यात आढळले हे प्राणीपाणवठ्यावरील कॅमेºयात बिबट्या, कोल्हा, निलगाय, चिंकारा, मोर, ससा, सायाळ, पाणकोंबड्या, बगळे, रानडुक्कर, लांडगे, तरस, घार, रानमांजर, अस्वल, हरीण असे विविध वन्यप्राणी आढळून आले़बिबट्यांची संख्या जास्तवनविभागाकडून बुध्दपौर्णिमेच्या रात्री जिल्हयातील ८ वनक्षेत्रात १३ बिबट्या आढळून आले आहेत़ मात्र जिल्ह्यात बिबट्याची संख्या ३० ते ३५ असल्याचा दावाही वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे़ काही वन्यप्राणी रात्री भ्रमंती करत नसल्याने त्यांची मोजणी होते़ यात कमी अधिक प्रमाण असू शकते असेही त्यांनी सांगितले़कॅमेरे ट्रॅपिंगद्वारे गणनाराष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून (एनटीसीए)तर्फे देशभरात दर चार वर्षानंतर प्राणी गणना केली जाते़ महाराष्ट्रात दोन टप्प्यांत ही गणना केली जाते़ प्राण्यांचा अधिवास असलेल्या मर्यादित जागांवर कॅमेरे ‘ट्रॅपिंग’ लावून प्राण्यांची गणना होते़ त्यासाठी त्याक्षेत्रातील तज्ञ स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाते़

टॅग्स :Dhuleधुळे