शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

धुळे महापालिकेत ‘लिफ्ट’चे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 9:36 PM

स्वतंत्र दोन ठिकाणी व्यवस्था : लवकरच सुरु होण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेच्या नुतन इमारतीत ‘लिफ्ट’ बसविण्याचे काम महिन्याभरापासून सुरु आहे़ आता ते अंतिम टप्प्यात आले असून लवकरच कार्यान्वित होणार आहे़ दोन स्वतंत्र लिफ्टसाठी सुमारे ४० लाखांचा खर्च झालेला आहे़ जुन्या इमारतीत नगरपालिका कार्यान्वित असतानाच २००३ मध्ये नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत करण्यात आले़ साहजिकच सर्वच कामांचा भार वाढला़ त्यातच शहराचा विस्तार देखील वाढला़ शहरालगतची गावे महापालिकेत वर्ग करण्यात आले आहेत़ जुनी इमारत प्रशासकीयदृष्ट्या  सोयीस्कर नसल्याने महापालिकेच्या शाळा नंबर एक येथे नुतन इमारत बांधण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला़ टप्प्या-टप्प्याने काम मार्गी लावत असताना आता या इमारतीत महापालिकेचा कारभार सुरुही झाला आहे़ अधिकारी आणि पदाधिकारी यांचे स्वतंत्र दालन आणि कर्मचाºयांसाठी देखील स्वतंत्र्य व्यवस्था मार्गी लावण्यात आलेली आहे़ सर्व काही असताना तीन मजली इमारतीत ‘लिफ्ट’ची सोय करण्यात आली होती़ परंतु तिचे बांधकाम अपूर्ण होते़ गेल्या महिन्याभरापासून नव्या ‘लिफ्ट’चे काम सुरु झाले असून आता हेच काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे़ अंदाजे १५ दिवसांत काम मार्गी लागून ‘लिफ्ट’ची सुविधा अधिकारी, पदाधिकाºयांसह सर्व सामान्य नागरीकांना मिळू शकेल़‘लिफ्ट’ उभारणीचे काम मुंबई येथील ओटीस कंपनीला देण्यात आले आहे़ प्रत्येकी २० लाखांप्रमाणे दोन ‘लिफ्ट’ तयार करण्यात येत आहे़ ८ टन वजन अर्थात एका वेळेस १० जणांना ‘लिफ्ट’ची सुविधा मिळू शकेल़ ‘लिफ्ट’ तयार झाल्यानंतर पुढील ३ वर्षापर्यंत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहणार आहे़ अत्याधुनिक अशी ‘लिफ्ट’ महापालिकेत बसविण्यात येत असल्याने ती केव्हा सुरु होईल, याचीच उत्सुकता आता नागरीकांना लागली आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे