लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील आझादनगर भागातील चांदतारा चौक येथे कत्तलीसाठी अवैधरित्या डांबून ठेवलेल्या १९ जनावरांची सुटका करण्यात आली़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी केली़ याप्रकरणी संशयित साबीर अकबर शेख (रा़ चांदतारा चौक, धुळे) या संशयिताविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील आझादनगर भागातील चांदतारा चौकात छापा टाकला़ त्याठिकाणी असलेल्या एका पत्रटी शेडमध्ये पथकाने तपासणी केली़ यावेळी त्या ठिकाणी दाटीवाटीने बांधून ठेवलेली १९ जनावरे मिळून आली़ त्यांची त्याचक्षणी सुटका करण्यात आली़ ही जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचा संशय पोलिसांना आल्याने कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी विशाल पाटील यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयित साबीर अकबर शेख याच्या विरोधात आझादनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला़ पुढील तपास सुरु आहेत़ परिसरात या घटनेची दिवसभर चर्चा सुरु होती़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, आझादनगर पोलीस स्टेशनचे शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पोलीस उपनिरीक्षक नागलोत, हेड कॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, पोलीस कर्मचारी मायुस सोनवणे, मनोज पाटील, तुषार पारधी, चेतन कंखरे, विशाल पाटील, गुलाब पाटील, महेश मोरे, भोई असे स्थानिक गुन्हे शाखा आणि आझादनगर पोलीस अशा संयुक्त विद्यमानाने ही कारवाई करण्यात आली़ ८६ हजार रुपये किंमतीची १९ जनावरे ताब्यात घेण्यात आली आहे़
धुळ्यातील चांदतारा चौकातून १९ जनावरांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:27 PM
कत्तलीचा प्रयत्न : एलसीबी आणि आझादनगर पोलिसांची कारवाई
ठळक मुद्देआझादनगर भागातील चांदतारा चौक येथील घटनाकत्तलीसाठी अवैधरित्या डांबून ठेवलेल्या १९ जनावरांची सुटकास्थानिक गुन्हे शाखा आणि आझादनगर पोलिसांची संयुक्त कारवाई