शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

लॉकडाउनमध्ये कष्टकऱ्यांना ‘शिवभोजन’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 10:03 PM

पाच रुपयात जेवण : अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्णांसह नातेवाईकांची झाली सोय, वस्त्यांनाही लाभ

धुळे : कोरोना लॉकडाउनच्या काळात शासनाची शिवभोजन योजना गरजूंसाठी खºया अर्थाने आधार ठरली आहे़संचारबंदीमुळे लहानमोठे सर्व हॉटेल्स बंद असताना सर्वसामान्यांची जेवणाची गैरसोय होवू नये यासाठी शिवभोजन केंद्र सुरूच ठेवण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतल्याने अनेकांची उपासमार टळली आहे़ विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात शिवभोजन थाळीचा दर दहा रुपयांवरुन पाच रुपयांवर आणल्याने हातावर पोट असणाºया कष्टकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़शासनाने शिवभोजन योजना सुरू केली त्यावेळी धुळे शहरात केवळ बाजार समिती आणि बस स्थानक अशा दोन ठिकाणी केंद्र सुरू केले होते़ त्यावेळी ७५ थाळ्यांची मर्यादा होती़ परंतु आता लॉकडाउनमध्ये गरजूंची गैरसोय होवू नये यासाठी शंभर थाळ्यांची परवानगी दिली आहे़ तसेच प्रशासनाने नव्याने तीन केंद्र सुरू केले आहेत़ त्यात देवपूर बस स्थानक येथे देविदास लोणारी, कमलाबाई शाळेसमोर संदीप चव्हाण यांना शिवभोजन केंद्राची परवानगी मिळाली आहे. तर जिल्हा न्यायालयात देखील शिवभोजन केंद्र सुरू झाले आहे़ त्यामुळे धुळे शहरात शिवभोजन केंद्रांची संख्या आता पाच झाली आहे़ विशेष म्हणजे या पाचही केंद्रांच्या परिसरात हातावर पोट असणाºया कष्टकºयांची वसाहत असून तात्पुरत्या झोपडीत राहणाºया निराधार कुटूंबांची संख्या देखील मोठी आहे़ या सर्वांची सोय या केंद्रांमध्ये झाली आहे़ याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सफाई कामगार यांचाही भोजनाचा प्रश्न सुटला आहे़ घरी जाण्यापेक्षा अनेक कर्मचारी शिवभोजन केंद्रातून पार्सल घेवून वेळ मिळेल तेव्हा भोजन करताना दिसत आहेत़ शिवभोजन केंद्रांवर भोजन तयार करण्याआधी स्वच्छता पाळली जात असून पार्सल देताना देखील सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा राखण्यात येत आहे़कोरोना विषाणू प्रादुभार्वामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आदी नागरिकांचे जेवण अभावी हाल-अपेष्टा होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने निर्देश दिले आहेत की, शिवभोजनाच्या प्रती थाळीसाठी लाभधारकाकडून पाच रुपये इतकी आकारणी करावी. याबाबत वाढीव अनुदान यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पुढील तीन महिन्यांपर्यंत याच दराने शिवभोजन थाळीचा दर असेल, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिले आहेत.गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन २६ जानेवारी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाउन घोषित झाले आहे. त्यामुळे शिवभोजन उपलब्ध करुन देणारी भोजनालये बंद करण्यात आली होती़ परंतु २८ मार्च पासून शिवभोजन केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले़ भोजनालयातून व्यावसायिक कारणासाठी जेवण उपलब्ध करुन दिल्यास दंडात्मक स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. शिवभोजन केंद्र चालकांनी ग्राहकांना शक्यतो आवेष्टित स्वरुपात भोजन उपलब्ध करुन द्यावे. शिवभोजन तयार करण्याआधी संबंधितांनी किमान २० सेकंद हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिवभोजन केंद्र चालकांनी सर्व भांडी निर्जतूंक करावीत, शिवभोजन तयार करणाºया कर्मचाºयांनी साबणाने वारंवार हात धुवावेत, सर्वांनी मास्कचा वापर करावा तसेच प्रत्येक ग्राहकात किमान एक मिटर अंतर राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत़कोरोनामुळे जेवण बंद, पार्सल सुरूशिवभोजन केंद्र सुरू असली तरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येथील जेवणाची व्यवस्था मात्र लॉकडाउनच्या काळात बंद करण्यात आली आहे़ आता केवळ जेवणाचे पार्सल मिळत आहे़ गरजू ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून रांगेत उभे राहावे लागते़ अतिशय शिस्तबध्द पध्दतीने जेवणाचे पार्सल दिले जातात़ अत्यावश्यक उपचारांसाठी ग्रामीण भागातून शहरातील विविध दवाखान्यांमध्ये आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चांगली सोय झाली आहे़ केवळ पाच रुपयाला एका जणाचे जेवण होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा खर्च देखील कमी झाला आहे़ सकाळी ११ ते तीन अशी शिवभोजनाची वेळ आहे़शिवभोजन केंद्रांवर गरजू नागरीकांची चांगली सोय झाली आहे़ परंतु केवळ शंभर थाळ्या देण्याची परवानगी असल्याने काही ग्राहकांना परत पाठवावे लागते़ हात स्वच्छ धुतल्यानंतरच कारागिर जेवण तयार करण्याचे काम सुरू करतात़ वाटप करतानाही दक्षता घेतली आहे़- देविदास लोणारी, केंद्र चालक

टॅग्स :Dhuleधुळे