लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका हद्दीत ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला़ जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आदेश पारीत केले़कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला असून महापालिका क्षेत्रात १८ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या अनुषंगाने २२ मे रोजीच्या रात्री १२ वाजेपासून ते ३१ मे रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़या कालावधीत किराणा दुकाने, स्वस्त धान्य, दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने, छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट/कव्हरची दुकाने, वखार (सॉ मिल), कुलर, एसी, पंखे साहित्याची दुकाने, दूध विक्रेते, गॅस एजन्सी व पेट्रोलपंपचालकांसाठी सकाळी ९ ते दुपारी २ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
धुळ्यात ३१ मे पर्यंत वाढविला लॉकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 8:54 PM