लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धुळे ग्रामीण मधून युतीच्या उमेदवाराला साथ दिली, तशीच साथ विधानसभेच्या निवडणुकीतही द्यावी असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेर (ता. धुळे) येथे केले.भाजप-सेना युतीच्या धुळे ग्रामीण मतदार संघाच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारार्थ नेर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. विधानसभेच्या निवडणुकीची मुख्यमंत्र्यांची पहिली प्रचार सभा धुळे ग्रामीण मध्ये झाली. व्यासपीठावर माजी संरक्षणमंत्री राज्य मंत्री तथा खासदार डॉ.सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, गजानन बापू पाटील, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुभाष देवरे, जि.प.चे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, प्रा. अरविंद जाधव, ज्ञानज्योती मनोहर भदाणे पाटील, किशोर सिंघवी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्टवादीचा चांगलाच समाचार घेतला.कॉंग्रेस संपण्याच्या मार्गावर आहे. येणारे सरकार हे भाजपा सेना युतीचेच येईल. लोकसभेच्यावेळी धुळे ग्रामीणच्या जननेते डॉ. सुभाष भामरे यांना ज्याप्रमाणे साथ दिली त्याचप्रमाणे ज्ञानज्योती भदाणे यांनाही साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.सभेला देवेंद्र पाटील, नगावच्या माजी सरपंच सुशिला दत्तात्रेय भदाणे, भाऊसाहेब देसले,अनिकेत पाटील, राम भदाणे, शंकर खलाणे, गुलाबराव बोरसे, मनिष जोशी, धुळे मनपा नगरसेवक, भाजपा-शिवसेना-रिपाईचे महायुतीचे पदाधिकारी, शाखा प्रमुख, धुळे ग्रामीण मधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो चेअरमन, सदस्य आदी उपस्थित होते.
Vidhan Sabha 2019 : लोकसभेप्रमाणेच मतदारांनी साथ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 10:24 PM