लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मालेगाव रोडवरील रामवाडी परिसरातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशिन चोरट्याने लांबविल्याची घटना पहाटे घडली आहे़ या मशिनमध्ये लाखो रुपये असल्याने बँकेला दिवाळीतच आर्थिक फटका बसला आहे़ शहरातील मालेगाव रोडवर लहान मोठे दवाखाने अधिक आहेत़ त्यामुळे विविध बँकांचे एटीएम मशिन कार्यरत आहेत़ त्यात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशिन चोरट्याने फोडले नसून लांबविले असल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे़ या एटीएम मशिनमध्ये शुक्रवारीच ५ लाखांची रक्कम टाकल्याची माहिती समोर येत आहे़ वाहनातून मशिन चोरुन नेत असताना सीसीटीव्हीत चित्रीकरण कैद झाले असून नवीन पिकअप व्हॅनमधून लांबविले आहे़ याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराच्या वायरी तोडलेल्या आढळून आलेल्या आहेत़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़
धुळ्यात चोरट्यांनी लांबविले एटीएम मशिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:10 AM
मालेगाव रोड : लाखो रुपयांचा बँकेला फटका
ठळक मुद्देआयसीआयसीआय बँकेचे होते एटीएम मशिनलाखो रुपयांचा बसला आर्थिक फटका