लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चाळीसगाव रोडवरील पवन नगरात असलेल्या कॉम्प्लेक्समधील चार दुकानाला आग लागली़ यात दुकानातील कुशन जळून खाक झाले़ ही घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ ही आग शॉकसर्किटने लागल्याचा अंदाज आहे़ चाळीसगाव रोडवर पवन नगरलगत मुल्ला कॉम्प्लेक्स आहे़ या कॉम्प्लेक्समध्ये तळ मजल्यावर दुकाने असून वरच्या मजल्यावर निवास आहेत़ रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र नामक कुशन दुकानात अचानक आग लागली़ आग लागल्याचे कळताच तातडीने या भागातील नागरीकांनी महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला बोलाविले़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी अवघ्या काही मिनीटांत दाखल झाले़ त्यांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला़ याशिवाय महामार्गावरील एका बंबाला पाचारण करण्यात आले़ एकूण तीन बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला़ या तौसिफ शहा यांचे रॉयल कार या दुकानाला आग लागली़ यात सीट कव्हर, कुशन व भंगाराचे साहित्य जळून खाक झाले़ अंदाजे ७० हजाराचे नुकसान झाले़ सलाम सय्यद यांचे न्यू महाराष्ट्र कुशन दुकानाला आग लागली़ त्यात कुशन जळून खाक झाले़ त्यात अंदाजे ४० हजाराचे नुकसान झाले़ तनवीर खान यांचे मणियार मोटर्स दुकानाला आग लागली़ त्यात कुशन जळून खाक झाल्याने अंदाजे १२ हजाराचे नुकसान झाले़ तसेच विलास चौधरी यांचे मेडीकल दुकान आहे़ त्यांचे विजेचे मीटर जळाल्याने अंदाजे १० हजाराचे नुकसान आहे़ असे एकूण १ लाख ३२ हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ या आगीत दुकानातील कुशन जळून खाक झाले असलेतरी नेमके किती रुपयांचे नुकसान झाले याचा कोणताही आकडा अद्याप समजलेला नाही़ आग शॉकसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले होते़ दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची कोणतीही नोंद झालेली नव्हती़
धुळ्यातील कुशन दुकानाला आग, लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 9:41 PM
पवन नगरातील घटना : शॉर्ट सर्किटचा अंदाज
ठळक मुद्देधुळ्यातील साक्री रोडवरील पवन नगरातील घटनाआगीत कॉम्प्लेक्समधील चार दुकानांचे नुकसानसायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात नोंदच नव्हती