शिरपूर : शहरातील कर्मवीर व्यंकटराव रणधीर सीबीएसई स्कूलमध्ये आयोजित समर कॅम्पमध्ये चिमुकल्यांनी धमाल करीत आनंद मिळविला़उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनीला मनसोक्त धमाल, मस्ती करता यावी म्हणून के.व्ही.टी.आर. सी.बी.एस.ई.च्या स्पोर्टस क्लबतर्फे समर कॅम्प-२०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये शालेय विद्यार्थ्यांना विविध कलाकौशल्य आत्मसात करता यावेत, यासाठी विविध खेळांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षित दाखवून शिकविले जात आहे़२२ एप्रिलपासून सकाळी ७ ते १२़३० या वेळेत हा कॅम्प घेण्यात येत आहे. १ मे पर्यंत हा समर कॅम्प चालणार आहे. स्कूलच्या प्रांगणात व नुकतेच लोकार्पण केलेल्या बास्केट बॉल व स्केटिंग कोर्टवर स्केटिंग, बास्केटबॉल, फुटबॉल, बॉक्सिंग, फेन्सिंग (तलवारबाजी) आदी मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये नृत्य, स्वरक्षणाचे धडे दिले जात आहेत़ तसेच योगा, चित्रकला, ग्लास पेंटिंग, मूर्तीकला, रंगकला आदी विविध कौशल्य शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे़शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये तज्ञ प्रशिक्षकांना नियुक्त केले असून त्यात क्रीडाशिक्षक निलेश सोनार, कला शिक्षक संजय भदाणे, योगशिक्षक योगेश सोनार, श्रीकांत चव्हाण, नेहा कासार, विजेंद्रसिंग जाधव, पंकज बारी, निखील पवार, दिपक पवार, दिपक कोळी, राकेश चौधरी, जितेंद्र मराठे, उमेश धनगर मार्गदर्शन करीत आहेत़कॅम्पचे व्यवस्थापन शाळेचे क्रीडा शिक्षक निलेश सोनार व कलाशिक्षक संजय भदाणे यांनी केले आहे. त्यांना शाळेच्या प्राचार्या प्रसन्ना मोहन, समन्वयक अमोल सावळे, सागर वाघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
समर कॅम्पमध्ये चिमुकल्यांची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:30 PM