व्यावसायिकांची मनपात धाव : तीन कोटींच्या थकबाकीसाठी प्रशासनाची कारवाई
धुळे, दि.29- शहरातील पाचकंदिल परिसरात असलेल्या महापालिकेच्या चार मार्केटपैकी दोन मार्केटला मनपाने बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सील ठोकल़े तर अन्य दोन मार्केटपैकी एका मार्केटमधील काही गाळे, ओटे सील करण्यात आल़े मनपाच्या या कारवाईनंतर व्यावसायिकांनी मनपात धाव घेतली होती़
शहरातील पाचकंदिल परिसरात महापालिकेचे शिवाजी मार्केट, शंकर मार्केट, भाजीपाला मार्केट व फळमार्केट आह़े त्यापैकी शिवाजी व शंकर मार्केटमधील गाळे व ओटय़ांचे करार संपलेले असल्याने व भाडय़ापोटी थकबाकी असल्याने मनपाने हे दोन्ही मार्केट पूर्णत: ‘सील’ केल़े शिवाजी मार्केटमध्ये 68 ओटे असून बाहेर 20 दुकाने आहेत़, तर थकबाकी 1 कोटी 56 लाख रूपये आह़े शंकर मार्केटमध्ये 73 ओटे व बाहेर 18 दुकाने असून थकबाकी 56 लाख रूपये आह़े भाजीपाला मार्केटमधील काही गाळे देखील सील करण्यात आल्याचे मनपा सुत्रांनी सांगितल़े सदर कारवाईसाठी मनपाचे पथक गेले असतांना व्यावसायिकांनी हमरीतुमरी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तत्काळ पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला़ कारवाईनंतर मार्केटमधील व्यावसायिक उपायुक्तांची भेट घेऊन कारवाई मागे घेण्याची मागणी करीत होत़े दरम्यान, दुपारी 3 वाजेपासून जे व्यावसायिक थकीत रक्कम भरत होते, त्यांच्या दुकानांचे सील उघडून देण्यास मनपा प्रशासनाने सुरूवात केली़
60 टक्के रक्कम भरणाऱ़़
महापालिकेतर्फे मार्केटमधील दुकानांचे करार संपले असल्याने रेडीरेकनर दरानुसार दुप्पट भाडेआकारणी केली जात़े मात्र दुप्पट आकारणीऐवजी एकाच आकारणीच्या 60 टक्के रक्कम भरण्याची तयारी व्यावसायिकांनी दर्शविली़ मात्र दुपार्पयत गोंधळाची स्थिती मनपात कायम होती़