लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे जिल्ह्यात आॅक्सिजनयुक्त बेडची कमतरता नाही. पुरेसे बेड उपलब्ध आहेत. आॅक्सिजनयुक्त आणखी दोनशे बेड तयार करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझेकुटुंब- माझी जबाबदारी’ ही महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आरोग्य विभागातर्फे प्रत्येकनागरिकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेस जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने प्रतिसाद देत कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले.धुळे जिल्ह्यात आजपासून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानास सुरवात झाली. या मोहिमेचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिल्हाधिकारी यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुम निकम, शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती मंगलाताई पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धरती देवरे, कृषीसमितीचे सभापती रामकृष्ण खलाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, संजय बागूल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. मनीष पाटील उपस्थित होते.संजय यादव म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू दर आणि पॉझिटिव्हीटी दरकमी होत आहे. ही समाधानाची बाब असली, तरी कोरोना विषाणूला हद्दपार करावयाचे आहे.त्यासाठी सर्वांचेसहकार्य आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांवर देखरेखीसाठी भरारी पथके नियुक्तकरण्यात आले आहे. या पथकांकडे नागरिकांनी तक्रार असेल, तर नोंदवायची आहे. प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेरभरारी पथकातील सदस्यांची नावे व मोबाईल क्रमांक तसेच उपचारावरील खचार्चे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे म्हणाले,‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येईल. नागरिकांमध्ये जनजागृतीचे प्रयत्न करण्यात येतील. दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा दुसरा टप्पा १४ आॅक्टोबरपासून सुरू होईल.मालपूर (ता.शिंदखेडा)येथेही ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येणार आहे.मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १० टीमच्या माध्यमातून १२ गावात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.मालपूर गावात तीन टिम सुराय एक, चुडाणे, अक्कलकोस, कलवडे एक, कर्ले एक, परसोळे एक, देवी, सतारे एक, रेवाडी एक, वाडी एक अशा या १० पथक असून,प्रत्येक पथकात तीन आशांचा समावेश करण्यात आला आहे.यात मालपूर उपकेंद्रा अंतर्गत गावातील होणाºया तपासणीवर आरोग्य सेविका बी. एस. वाडिले, व देवी उपकेंद्रा अंतर्गत गावात एम. पी. मार्कंड व पी. एम पवार हे लक्ष ठेवणार आहेत. या मोहिमे अंतर्गत प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येईल. कोरोना विषाणू ची लक्षणे आढळून येणाºया रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावयाचे आहे. यासाठी मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने सुक्ष्म नियोजन केले असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले.कासारे (ता.साक्री)येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेचा शुभारंभ आमदार मंजुळागावित यांच्या हस्ते करण्यात आला. योजनेच्या उदघाटनप्रसंगी साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य गोकुळसिंग परदेशी, पंचायत समिती सदस्या मनिषा अनिल देसले, साक्री नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयेश नागरे, चंद्रकांत देवरे, अनिल देसले, प्रांत अधिकारी भिमराव दराडे, तहसीलदार प्रविण चव्हाणके, साक्रीचे गटविकास अधिकारी जी.टी.सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आशुतोष साळुंके, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिती गावित, डॉ.सौरभ मावची उपस्थित होते.आरोग्य सहाय्यक गोरख पाटील,आर.पी.क्षत्रिय व अन्य कर्मचारी यांनी संयोजन केले.यावेळी ग्रामस्थही उपस्थित होते.
आॅक्सिजनयुक्त २०० बेड तयार करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 9:12 PM