आॅनलाइन लोकमतमालपूर (जि.धुळे) : अनेकदा मागणी करूनही मालपूर- रामी हा शेतीशिवारात जाणारा रस्ता दुरूस्त न केल्याने, अखेर शेतकऱ्यांनीच लोकवर्गणी करून रस्त्याची दुरूस्ती केली.शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील शेतशिवारातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. यामुळे रामी, खोक्राडे येथे जाण्यासाठी देखील प्रवांशाना काटेरी झाडे व खड्डे चुकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यातच या रस्त्याचा शेतशिवारातुन शेती माल घरी आणण्यासाठी देखील मोठी अडचण निर्माण होती. दोन वर्षांपूर्वी तयार झालेला मालपूर-रामी रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी शेतकºयांनी अनेकदा मागणी केली. मात्र संबंधित विभागाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. अखेर े येथील शेतकºयांनी वर्गणी गोळा करुन रामी मालपूर रस्त्यावरील काटेरी झाडी झुडपे तोडुन रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यात मुरुम टाकुन भराव केला. रस्ता दुरूस्त झाल्याने शेतकºयांना आपल्या शेतापर्यंत जाणे सोयीचे झालेले आहे.
धुळे जिल्हयातील मालपूर येथे शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्ता दुरूस्त केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:48 AM