धुळे : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी अंतिम भूसर्वेक्षणाचे काम पुणे मेसर्स हाइड्रोपनियम सिस्टम या कंपनीला ३ कोटी ९२ लाख रुपयांमध्ये देण्यात आल्याची माहिती मनमाड-इंदूर रेल्वे संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी दिली़ हे सर्वेक्षण नेमके कधी सुरू होईल ते मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भूसर्वेक्षणाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून निविदा काढणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले होते़ परंतु डिसेंबर उलटला तरी प्रक्रिया न झाल्याने मराठे यांनी वकिलामार्फत मध्य रेल्वेला नोटीस दिली होती़ त्यानंतर तत्काळ निविदा काढून पुणे मेसर्स हाइड्रोपनिक सिस्टम या कंपनीला ३ कोटी ९२ लाख रुपयांत हे काम देण्यात आले आहे़ ही कंपनी मनमाड ते महूपर्यंत भूसर्वेक्षण कधीही सुरू करू शकते़ ४० पैकी ३४ रेल्वेस्थानकांसह रेल्वेमार्ग, बोगदा, क्रॉसिंगसाठी विविध विभागांची परवानगी घेण्याचे कामदेखील पश्चिम रेल्वे सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनमाड-इंदूर रेल्वेसाठी भूसर्वेक्षणाचा मार्ग मोकळा!
By admin | Published: January 04, 2017 11:41 PM