लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा मनपाचे स्वीकृत नगरसेवक मनोज मोरे यांनी शुक्रवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला़ आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला़ यावेळी पदाधिकाºयांनी जोरदार घोषणाबाजी केली़मनोज मोरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे सादर केला़ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात ५८ मूकमोर्चे निघाले तरीही सरकारला जाग आली नाही़ त्यामुळे आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात सर्वत्र ८ ते १० दिवसांपासून विविध आंदोलने होत असतांनाही सरकार बघ्याची भुमिका घेत आहे़ त्यामुळे नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारण्यात आलेले धरणे आंदोलन सात दिवसांपासून सुरू आहे़
मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक मनोज मोरे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 5:49 PM
आरक्षणाच्या मागणीसाठी निर्णय, आयुक्तांना राजीनामा सादर
ठळक मुद्दे-सरकार बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन-पदाधिकाºयांची जोरदार घोषणाबाजी