लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : रस्त्यांवरील खड्डयांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेवर बाजू मांडण्यासाठी शासनाने मनपाकडून माहिती मागवली होती़ सदर माहिती मनपाने सादर केली असून त्यानुसार शहरात ४३५ किमीचे डांबरी व सिमेंटचे रस्ते असून त्यातील बहूसंख्य प्रमुख रस्ते सुस्थितीत असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे़मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत शहरांमधील रस्ते सुस्थितीत व अपघात विरहीत ठेवण्याबाबत नमुद करण्यात आले आहे़ त्यानुसार धुळे शहरात सुमारे ४३५ किमीचे सिमेंट व डांबरी रस्ते आहेत़ त्यापैकी बहूतांश मुख्य रस्ते सुस्थितीत असून रस्ते दुरूस्तीबाबत आलेल्या निवेदनानुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार रस्त्यांच्या दुरूस्तीची कार्यवाही करण्यात येत आहे़ सन २०१५-१६ च्या वित्तीय वर्षात रस्ता दुरूस्तीसाठी १ कोटी २५ लाख ५४ हजार ६१० रूपये खर्च करण्यात आला़ तर २०१७-१८ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पात ७५ लाख रूपयांची तरतुद करण्यात आली असून त्यातून रस्ता दुरूस्तीची कामे प्रस्तावित आहेत़ तसेच स्थानिक जिल्हा न्यायालयातील सेवा प्राधिकरणाकडून आलेल्या तक्रारींची दखल घेण्यात येत आहे़ शहर हद्दीतून जाणारे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ताब्यातील रस्ते दुरूस्तीबाबत संबंधितांना सुचित करण्यात आले आहे़ त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याची माहिती महापालिकेने शासनाच्या विधी विभागाकडे सादर केली असून त्यानुसार न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार असल्याची माहिती मनपा सुत्रांनी दिली़
धुळ्यातील बहुसंख्य रस्ते सुस्थितीत असल्याची माहिती मनपातर्फे शासनाला सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:24 PM
महापालिका : न्यायालयीन प्रकरणासाठी शासनाला माहिती सादर
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाºया प्रमुख जिल्हा मार्गांवरील एकूण खड्डयांपैकी २५ टक्के खड्डयांची तर राज्य महामार्गांवरील ४५ टक्के खड्डयांची दुरूस्ती करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे यांनी दिली़ उर्वरीत खड्डयांच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले़खड्डे दुरुस्तीचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.