शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पूर्वसंध्येला गर्दीने बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:04 AM

‘व्हॅलेंण्टाईन डे’चा उत्साह : गुलाबाची फुले, टेडी, चॉकलेट्स व ग्रीटिंग्जना वाढती मागणी

धुळे : देशभरात गुरूवारी साजरा होणाऱ्या ‘व्हॅलेंण्टाईन डे’चा अपूर्व उत्साह शहर व जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही दिसून आला. या दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या प्रियजनांना भेटीदाखल देण्यात येणाºया विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिक विशेषत: तरूणाई बाहेर पडली होती. वस्तू खरेदी करणाºयांमध्ये आबालवृद्धांचा मोठा सहभाग दिसून आला.व्हॅलेंण्टाईन डे साजरा करण्यापूर्वी वेगवेगळे दिवस साजरे करण्याची क्रेझ वाढत आहे. रोझ डे, टेडी डे, चॉकलेट् डे अशा विविध नावाने एकेक दिवस साजरा केला जातो. मात्र या सर्वांवर ‘व्हॅलेंण्टाईड डे’ निश्चितच कळस चढविणारा ठरतो. त्याचा प्रत्यय बुधवारी पूर्वसंध्येला आला. दुपारपासून बाजारांमध्ये गर्दी होऊ लागली होती. संध्याकाळी तरुणाईसह साºयांच्या निरनिराळ्या वस्तू, साहित्याच्या खरेदीच्या उत्साहाला उधाण आले होते. त्यामुळे विक्रेत्यांना दुकानात परस्परांशी सवड मिळत नसल्याचे दृश्य दिसले. येणाºया प्रत्येकास त्याच्या आवडीप्रमाणे एकेक वस्तू दाखविण्यात ते गढून गेल्याचे दिसून आले.गेल्या वर्षीपेक्षा यंदा गर्दी कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दुष्काळामुळे ग्रामीण भागातून खरेदीस येणाºया ग्राहकांची गर्दी काहीशी आटल्याचे सांगण्यात आले. गुलाबाची फुले, विविध आकारातील व रंगातील टेडी बीअर, त्याच प्रमाणे चॉकलेट्स, विविध मनोहारी रंगात उपलब्ध असलेली ग्रीटिंग्ज कार्ड नागरिकांचे लक्ष वेधत होते. त्यांच्या किमती १० रुपयांपासून दीडशे रूपयांपर्यंत होत्या.वस्तूंची आकर्षक पॅकिंगखरेदीच्या बजेटनुसार विचारणा केली जाऊन तत्परतेने खरेदी केली जात होती. घेतलेल्या वस्तूंची आकर्षक कागदात बांधण्यासाठी दुकानदारांना प्रेमळ विनंती करण्यात येत होती. व्हॅलेंण्टाईन डेसाठी खरेदी केलेल्या वस्तूंचे महत्त्व जाणून असलेल्या विक्रेत्यांकडून पॅकिंगचा अतिरिक्त खर्च न घेता त्याचा भार ते स्वत:च उचलताना दिसून आले. त्यासाठी खास करून एक-दोघांची नियुक्तीही करण्यात आली होती.इमिटेशन ज्वेलरीलाही मागणीमहाविद्यालयीन तरूणी व महिलांकडून यानिमित्ताने भेट देण्यासाठी इमिटेशन ज्वेलरीस पसंती दिली जात होती. विशेषत: आकर्षक नेकलेस, कानातील रिंगा, तसेच वेगवेगळ्या डिझाईन व रंगाच्या ज्वेलरीला मागणी असल्याचे अजय महाजन यांनी सांगितले.गुलाबावर जास्त भरव्हॅलेंण्टाईन डे निमित्त भावनांना अधोरेखीत करण्यासाठी लाल गुलाबावर जास्त भर असल्याचे विक्रेते सागर माळी यांनी सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा गर्दी कमी असली तरी यंदाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्ष व्हॅलेंण्टाईन डे दिनी अजून जोरदार प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त झाली. आग्रारोडवरील झगमगाट या निमित्ताने वाढल्याचे दिसून आले.

टॅग्स :Dhuleधुळे