धुळ्यात एलसीबीच्या छाप्यात मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:30 PM
माधवपुरा परिसर : १६ जिवंत जनावरांसह १ जण ताब्यात, अन्य फरार
लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील माधवपुरा परिसरातील अलजोहरा क्लिनीकच्या समोर राहणाºया नियाज अन्सारी याच्या घर वजा वाड्यात सोमवारी पहाटे सव्वा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला़ यात १० लाख ५१ हजार ८२२ रुपये किंमतीचे मांस, १६ जीवंत गुरांसह १ लाख ६६ हजार ८२० रुपये आणि पिकअप वाहन जप्त करण्यात आले़ या कारवाईत संशयित फैसल खान फारुख खान हा जागीच मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहेत़ तर संशयित नियाज अन्सारी (धुळे) आणि सलमान खान (मालेगाव) या दोघांसह अन्य चार ते पाच जण घटनास्थळावरुन फरार झाले आहेत़ आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली़