लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : पुणे येथे सुरु असलेल्या २३ वर्षे आतील सी.के.नायडू करंडकमध्ये येथील क्रिकेट अॅकडमीचा खेळाडू मेहुल पटेल याने महाराष्ट्र संघाकडून खेळतांना १५६ धावांची उत्कृष्ट शतकी खेळी करून आंध्रप्रदेश संघाविरुद्ध विजयश्री प्राप्त करून दिला. मेहुल पटेल सोबत त्याचा संघ सहकारी स्वप्नील फुलपाखर याने सर्वात जास्त १८९ धावा केल्या. आंध्रप्रदेश संघाने ४२९ धावांचा टार्गेट दिला होता. तो या दोघांनी ७ गडी राखून यशस्वीरित्या पार पाडला.मेहुल पटेल याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन आपल्या संघास विजय मिळवून दिला. मेहुलने १५६ धावांच्या खेळीत २४४ चेंडूमध्ये १७ चौकार व २ षटकार मारले. मेहुल व स्वप्नील यांच्या खेळीमुळे महराष्ट्रा संघाचे बेस्ट आॅफ फाइवचे आव्हान जिवंत केले. त्यांच्या यशाबद्दल व उत्कृष्ट कामगिरी बद्दल संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, राजगोपाल भंडारी, नविन शेट्टी, प्रितेश पटेल, डॉ.उमेश शर्मा यांनी कौतुक व्यक्त केले. मेहुल पटेल हा शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशनचा माजी खेळाडू असून प्रशिक्षक फिरोज शेख, राकेश बोरसे, संदीप देशमुख, राहुल स्वर्गे, पूजा जैन यांचे मार्गदर्शन लाभले.
मेहूल पटेलचा आंध्रप्रदेश संघाविरुद्ध मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 9:12 PM