शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

संदेश भूमीवर पार पडले भीमकाव्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 9:56 PM

३१ जुलैच्या आठवणींना उजाळा । डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

धुळे : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी धुळे शहराला भेट दिल्याच्या ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यासाठी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती, अंकुर साहित्य संघ धुळे शाखा व लोककवी दिपक निकम काव्यधारा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रव्हल बंगला येथील संदेशभूमीवर भिमकाव्य संमेलन आयोजीत करण्यात आले होते़संदेशभूमीवर बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत अभिवादन करण्यात आले़ भिमकाव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक नामदेवराव शिरसाठ होते़ बाळापुर, फागणे, नरव्हाळ, गोंदुर, वाडीभोकर व धुळे महानगराच्या विविध भागातुन २० कवि-कवयत्रिंनी काव्यसंमेलनात सहभाग घेतला़कविसंमेलनाची सुरुवात बुध्द वंदनेने करण्यात आली़ प्रास्तविक प्रा. राम जाधव यांनी केले़ शाहिर भास्कर आमृतसागर, कवि गुलाबराव धनजी मोरे, युवा कवयत्री मयुरी थोरात, कवि मोहन पवार, बालकवी राजरत्न पवार, शाहिर शंकरराव पवार, कवि रमेश सुर्यवंशी, शंकर सोनवणे, कवि दत्तात्रय कल्याणकर, कवि पानपाटिल, कवि प्रा. राम जाधव, नामदेव शिरसाठ आदींनी विविध भीमगितांच्या माध्यमातून काव्यसंमेलनात रंगत आणली़शेवटच्या सत्रात संदेशभुमी कृती समिती अध्यक्ष आनंद सैंदाणे, उपाध्यक्ष बापु नेरकर यांच्या हस्ते सर्व उपस्थित कवि साहित्यकांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला़ संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. जाधव यांनी केले तर कवि कल्याणकर यांनी आभार मानले़यावेळी हरिचंद्र लोंढेख श्रीराम तायडे, रवींद्र शिंदे, देविदास शिरसाठ, रवींद्र इंदवे, विशाल सोनवणे, विजय मोरे, दिपक नगराळे, राहुल वाघ, शरद वेंदे, दादा खंडारे, सुनील थोरात, अमित सोनवणे, सिध्दार्थ जाधव, मंगेश जाधव, कविश्वर गणेश उपस्थित होते़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जुलै १९३७ मध्ये धुळे शहराला भेट दिली होती़ धुळेकर जनतेने रेल्वे स्टेशनपासून ट्रॅव्हल्स बंगल्यापर्यंत (बस स्थानकाजवळील शासकीय विश्राम गृह) भव्य मिरवणूक काढली होती़ या घटनेला ८३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़

टॅग्स :Dhuleधुळे