लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात कोरोना विषाणूचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री पासून ते २२ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली़ दरम्यान, कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण सापडला त्यांच्या घरापासून दोन्ही बाजुला दीड - दीड असा एकूण तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.शहरातील वडजाई रोडवरील गजानन कॉलनीतील ४५ वर्षीय व्यक्तीचे कोरोनाचे रिपोर्ट सोमवारी पॉझीटीव्ह आले. जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा रूग्ण पॉझीटीव्ह आढळला आहे. याआधी साक्रीतील ५३ वर्षीय व्यक्तीचा ९ एप्रिलला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.असा केला आहे सील परिसरवडजाई रोडवर गजानन कॉलनीत एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने त्या भागातील १.५ किलोमीटरचे संपूर्ण क्षेत्र कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित केला आहे़ त्या परिसरातील ३ किलोमीटरचे क्षेत्र ‘बफर झोन’ म्हणून घोषित केला आहे. या कंटेन्मेंट क्षेत्रामध्ये नटराज टॉकीज, ८० फुटीरोड क्रॉसिंग पासून डी़ पी रस्त्याने कॉटन मार्केट पारोळारोड ते दक्षिणेकडे वाखारकर नगर ते नवीन पेट्रोलपंप पावेतो तसेच अरिहंत मंगल कार्यालय व अलंकार सोसायटी परिसर तसेच वडजाई रस्त्यालगत मायक्रो पाण्याची टाकी ते १०० फुटी रस्त्याने चाळीसगाव रोड, लोकमान्य हॉस्पिटल तसेच ग.नं.७ पारोळा रोड क्रॉसिंगे ते गिंदोडिया हायस्कूल नटराज टॉकीज पावेतोचे क्षेत्र पूर्ण सिल केला आहे़ तसेच संपूर्ण क्षेत्रात रसायन फवारणी व थर्मल स्कॅनरद्वारे भागातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे़ महानगरपालिकेमार्फत या भागात उपाययोजना प्रतिबंधात्मक कार्यवाही युद्धपातळीवर सुरु केल्या.़मनाई आदेश लागूकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम १४४ लागू केला आहे़ त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला रस्त्यांवर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यांवर, गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई आहे़ मात्र यातून अत्यावश्यक सेवेची सवलत मिळालेल्यांना सुट आहे. त्या सर्वांनी कार्यालयीन ओळखपत्र जवळ बाळगावे.सार्वजनिकरित्या नमाज अदान करण्याचे आवाहनकोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या रमजान या पत्रि महिन्यात मुस्लिम बांधवांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या १८ एप्रिलच्या परिपत्रकानुसार सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे हे आरोग्याच्या आणि जीवनाच्या हिताचे असल्याने सार्वजनिकरित्या नमाज अदा करु नये़ शासन अधिसूचनेनुसार सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे.
दोन दिवसांसाठी महानगर लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 9:55 PM