शिंदखेडा - तालुक्यातील आरावे येथे पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक चार गाळयाचे मातीच्या धाब्याचे लाकडी घर कोसळले़ त्याखाली दबल्याने १९ आणि १५ वर्षीय दोन चुलत बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथे भटू भालचंद्र देशमुख(वाणी) हे भाडयाचे घर घेऊन राहत होते. गुरूवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्यांचे घर अचानक कोसळले़ त्यात त्याची १९ वर्षाची मुलगी रूपाली व १५ वर्षीय पुतणी जयश्री सुपडू देशमुख या दोघींचा दबून मृत्यू झाला. तर भटू वाणी आणि त्यांच्या पत्नी निर्मलाबाई या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. दोघांना अधिक उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. भटू वाणी मुळचे शेवाडे ता.शिंदखेडा येथील राहणारे असून शेतमजुर म्हणून काम करण्यासाठी आरावे येथे येऊन राहत होते. मयत पुतणी रूपाली हीची आई वारली असल्याने ती काकाकडे शिक्षण घेत होती.
मध्यरात्री मातीचे घर कोसळले, दोन मुलींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:00 AM
शिंदखेडा तालुक्यातील आरावे गावची घटना
ठळक मुद्दे- मध्यरात्री अचानक कोसळले घर- दोघा जखमींवर धुळयात उपचार सुरू- या घटनेनंतर परिसरावर शोककळा