म्हसदी : धुळे तालुक्यातील देऊर परिसरात सलग चार- पाच दिवसांपासून बिबट्या आढळून येत आहे. वन विभागात रविवारी दुपारी बिबट्या दिसला. मात्र, वन विभागाच्या पथकाला चकवा देत बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर सोमवारी सकाळी म्हसदी ते देऊर रस्त्यालगतच्या शेतामध्ये भरदिवसा बिबट्या आढळून आला. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.देऊर हद्दीतील उमराड येथे सकाळी नऊ वाजता बिबट्या दिसला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने देऊर शिवाराकडे धूम ठोकली. बघ्यांची गर्दी उसळल्याने बिबट्याने दाट झुडुपांत आश्रय घेतला. बिबट्याने झुडुपातून बाहेर पडत धूम ठोकली. यावेळी वन अधिकाºयाने त्याला भूल देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.वन विभागाचे धुळे वनक्षेत्रपाल महेश पाटील, वनपाल मुकेश सोनार, अनिल पाटील, डी.एम भामरे राकेश पाटील, हर्षाली आहिरे, पिंपळनेर वनक्षेत्रपाल अरूण महाळके, वनपाल एच.डी. देवरे, वनरक्षक एल.आर. वाघ, डी.एन. सोनवणे, एस.डी. चौधरी, टी.एल. चव्हाण, ए.एम. शेख, डी.बी. भोई, डी.व्ही. देसाई, वाय.जे. भिल, भूषण वाघ, पी.व्ही. सुर्यवंशी, बी.बी. पाटील, झेड.एम. बाविस्कर, डी.एम. पाटील, एन.एफ. पठाण, डी.आर. बागले, सी.एस. काळे, वनमजूर वसंत अहिरे, भटू बेडसे व कर्मचाºयांनी पाहणी केली आहे. धुळे उपवनसंरक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावण्याच्या सुचना केल्या. मात्र, सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत बिबट्या पिंजºयांजवळ फिरकलाच नाही.
देऊर परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:13 PM