लोकमत न्यूज नेटवर्कनरडाणा : दूधाच्या पिशव्या वाटप करणारी चारचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मागून धडकली. या अपघातात एकजण ठार तर दोनजण जखमी झाले. हा अपगात मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा रेल्वे उड्डाणपुलावर पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली.नेवासा येथून पतंजली दूध डेअरीच्या पिशव्या वाटप करणारी गाडी (क्र.जीजे ०५-बीएक्स ९४३९) धुळ्याहून शिरपूरकडे जात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने नरडाणा येथील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या ट्रकवर (क्र.एमएच १८-एएन २९९१)मागून जोरदार धडकली.या अपघातात संतोष पुंडलिक मोहीते (रा. खडका, ता. नेवासा, जि.नगर) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रूग्णवाहिकेद्वारे नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याठिकाणी डॉ. वाडेकर यांनी तपासून मोहिते यांना मृत घोषित केले. या अपघातात मनोज चव्हाण, व चालक सुरज राजकिशोर सरोज (२२, रा. मेहदिया, जि. प्रतापगड) हे दोघे जखमी झाले. अपघात होताच चालक सुरज सरोज हा फरार झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.याप्रकरणी मनोज चव्हाण याने नरडाणा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दूधाची गाडी उभ्या ट्रकवर धडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 8:21 PM