लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वीज चोरी करण्याचे प्रमाण सध्या चांगलेच वाढले आहे़ ही बाब वीज वितरण कंपनीच्या शोध पथकाला जाणवू लागली आहे़ मोहाडीत अचानक धाड टाकून १ लाख २४ हजार ४४० रुपयांची वीजचोरी पकडण्यात पथकाला यश आले़ याप्रकरणी महिलेविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ गेल्या काही दिवसांपासून वीज चोरी होत असल्याची बाब वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना जाणवू लागली आहे़ त्याअनुषंगाने ठिकठिकाणी अधिकारी आणि कर्मचाºयांचे पथक तैनात करण्यात आले असून त्यांच्याकडून धाडसत्र अवलंबिले जात आहे़ याचाच एक भाग म्हणून वीज वितरण कंपनीच्या पथकाने मोहाडी शिवारात धाड टाकली़ त्यात एका महिलेच्या घरात वीज चोरी होत असल्याची बाब उजेडात आली़ पथकाने ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या महिलेच्या घरासह पिठाच्या गिरणीवर छापा टाकला़ त्यावेळेस अनधिकृतपणे व बेकायदेशीरपणे सरकारी वीज मिटरच्या अंतर्गत रचनेतील सील तोडून त्यात फेरफार करुन मीटरची गती कमी केल्याचे तपासणीतून आढळून आले़ परिणामी विजेची चोरी होत असल्याचे स्पष्ट होत आहे़ यात १३ हजार ९५७ युनीटची विजचोरी झाल्याचे समोर आले़ त्याची किंमत १ लाख २४ हजार ४४० रुपये इतकी होते़ याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या अवधान एमआयडीसी येथील चंद्रवधन गोकुळ आहेर यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री ८ वाजता फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, पुष्पाबाई रमेश सातभाई (रा़ मोहाडी) या महिलेविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पुढील तपास सुरु आहे़
मोहाडीत पकडली लाखाची वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 8:07 PM