धुळे : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आली तर देशातील सर्व गरीब नागरिकांना किमान उत्पन्नाएवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे धुळे येथे झालेल्या सभेत केली.
सभेला नाशिक, नंदुरबार, जळगाव व धुळे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेल्या २५ उद्योगपतींचा भारत एकीकडे, तर सामान्य शेतकरी, बेरोजगारांचा भारत दुसरीकडे आहे. काँग्रेसला एकसंघ भारत हवा आहे. आश्वासनाची अंमलबजावणी हा काँग्रेसचा इतिहास आहे.काँग्रेसची विचारधारा देशाला आणि समाजाला जोडण्याची आहे. ही विचारधारा महाराष्ट्तरा सर्वात जास्त आहे. काँग्रेसची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचया जनतेचे आभार मानतो. आम्ही राज्यात राष्ट्रवादीसोबत लोकसभा निवडणूक लढवित आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पिकाला हमीभाव मिळाला का?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
महाआघाडी झाली पाहिजेप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत महाआघाडी स्थापन झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. राष्टÑवादीशी आघाडी झाली आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांना चार जागा देऊ केल्या आहे. सीपीएम, शेकाप, खासदार राजू शेट्टी यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व ७० टक्के विखुरलेले मतदान एकवटले तर त्याचा फायदा महाआघाडीला मिळेल, असेही चव्हाण म्हणाले.
बेरोजगारांना रोजगार देऊआम्ही देशातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देऊ. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात सत्ता येताच आश्वासनाची पूर्ती करीत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या दोन दिवसांत कर्जमाफी लागू केली, याची आठवण राहुल गांधी यांनी करुन दिली.रोजगारात चीनपेक्षा मागेदेशात २४ तासांत केवळ ४५० बेरोजगारांना रोजगार मिळतो. त्या तुलनेत चीन २४ तासात २४ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देतो. आपल्याला चीनशी बरोबरी करावी लागेल. आज आपण प्रत्येक वस्तुवर मेड इन चायनाचे लेबल पाहतो. ते बदलून त्या जागी मेड इन इंडिया, मेड इन महाराष्टÑ असे लेबल असलेल्या वस्तू आणाव्या लागतील. तेव्हाच चीनच्या बरोबरीने भारतातील बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. ते आम्ही करुन दाखवू, असे राहुल गांधी म्हणाले.