केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पितृशोक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 09:09 AM2018-03-31T09:09:22+5:302018-03-31T09:09:22+5:30
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे वडील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव सीताराम पाटील यांचे शनिवारी (31 मार्च) पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे.
धुळे : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे वडील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव सीताराम पाटील यांचे शनिवारी (31 मार्च) पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर मूळगावी मालपूर (साक्री) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.
रामराव यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रामराव पाटील हे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष होते. तसेच ते किसान सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन, पांझरा कानचे संस्थापक व चेअरमनपदही भूषविले होते. साक्रीच्या माजी आमदार गोजरताई भामरे यांचे ते पती होत. रामराव पाटील यांच्या सून धुळे जि.प. सदस्या मंगलाताई सुरेश पाटील या असून नात औरंगाबादच्या जि.प. अध्यक्षा देवयानी कृष्णा पाटील-डोनगावकरआहेत.