धुळे : सोन्याच्या वस्तुंना पॉलीश करुन देण्याचा बहाणा करीत महिलेच्या हातातील दोन बांगड्या शिताफीने लांबविल्याची घटना देवपुरातील उन्नती नगरात घडली़ लंपास झालेल्या बांगड्यांची ६० हजार रुपये इतकी किंमत होती़ याप्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ देवपुरातील नकाणे रोडवरील उन्नती नगर प्लॉट नंबर १६ मध्ये राहणाºया निर्मलाबाई अरुण भामरे या महिलेने पश्चिम देवपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, बुधवारी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास दोन अनोळखी तरुण आले़ त्यांनी दागिन्यांना पॉलीश करुन देण्याचे आमिष दाखविले़ त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला़ त्यांनी हातातील दोन्ही बांगड्या काढण्यास भाग पाडले़ हळदीच्या डब्यात सोन्याच्या बांगड्या न ठेवता माझी नजर चुकवून फसवणूक करीत सोबतच्या मित्राकडे देण्यात आल्या़ माझा हातात एक डबा देण्यात आला़ हा डबा गॅसवर ठेवून १० मिनीटानंतर उघडण्यास सांगितले आणि ते दोघेही निघून गेले़ १० मिनीटानंतर डबा उघडून पाहिले असता त्यात दागिने आढळून आले नाही़ आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला असता ते दोघे मिळून आलेले नाही़ अंदाजे त्यांचे वय २० ते २५ आहे़ ६० हजार रुपये किंमतीच्या ३ तोळे वजनाच्या ५ वर्षापुर्वी घेतलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या भामट्यांनी लंपास केल्या आहेत़ या प्रकरणी बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली़ सहायक पोलीस उपनिरीक्षक पी़ व्ही़ पोतदार घटनेचा तपास करीत आहेत़
महिलेची नजर चुकवून दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 10:15 PM