धुळे : स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या प्लास्टीक निर्मूलन मोहिमेतून २१०० किलो प्लास्टीक जमा करण्यात आले आहे. या प्लास्टीकवर कचरा डेपोत पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहेत. त्यावर आयुक्त शेख यांनीही सेल्फी घेतला.प्लास्टीक निर्मूलनासाठी मनपातर्फे तीन दिवसात रॅली, शपथ, पथनाट्य, स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, प्रदर्शन, जनजागृतीपर उपक्रम आदी विविध ११८ कार्यक्रम घेण्यात आले. जनजागृतीसाठी १९ प्रभागांमध्ये १९ पथकांची नियुक्ती केली होती. प्रत्येक पथकात पथक प्रमुख, प्रत्येकी ४ सहायक अशा समारे १२४ अधिकारी, कर्मचा?्यांमार्फत घरस्तरावर व भागातील दुकानदारांकडून प्लास्टीक कचरा जमा करण्यात आला. त्यांच्याकडून प्लास्टीक न वापराबाबत शपथपत्र भरुन घेण्यात आले. आजपर्यंत सुमारे ७३ हजार नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविलेला असून सुमारे २१०० किलो प्लास्टीक जमा करण्यात आले आहे. हे प्लास्टीक शहरातील १० केंद्रावर जमा करण्यात येत असून देवपूर नवरंग जलकुंभ येथील मुख्य संकलन केंद्रावर नेण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी गंगाधरन डी., आयुक्त अजीज शेख, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी सौजन्या पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत केली. शहरातील विविध भागात शाळांतर्फे जनजागृती रॅली व शपथ विधीचा कार्यक्रम घेण्यात आला. शहरात मुख्य ठिकाणी प्लास्टीक बंदीचे फलक असलेले सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत
‘सेल्फी’ काढत अभियानाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 11:17 PM