लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील मोगलाई भागातील फुले कॉलनीत राहणारा २२ वर्षीय अक्षय उर्फ तात्या सोनवणे हा तरुण पांझरा नदीत वाहून गेल्याची दुर्देवी घटना सोमवारी सकाळी घडली़ घटना लक्षात येताच त्याचा शोध घेण्याचे काम सुरु झाले़ ही माहिती पोलीस प्रशासनासह राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफ पथकाला कळविण्यात आली़ त्यांच्या माध्यमातून तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरु झालेले आहे़ दुपारपर्यंत वाहून गेलेला तरुण सापडलेला नव्हता़ दरम्यान, पांझरा नदी किनारी परिसरातील नागरीकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे़
धुळ्यातील पांझरा नदीत तरुण वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:36 PM