लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आमदार अनिल गोटे यांनी ‘माझं शहर बदलतयं’ या आंदोलनात पांझरा चौपाटी आपण पाडल्याचा आरोप केला असून तो पूर्णपणे निराधार, तथ्यहीन, खोटा व धुळेकर जनतेची दिशाभूल करणारा आहे, असा खुलासा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी केला आहे़ मुळातच पांझरा चौपाटी बद्दल जो काही वाद आहे. तो उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू होता़ उच्च न्यायालाच्या आदेशाप्रमाणे स्थानिक प्रशासनाने पांझरा चौपाटीवर कार्यवाही केलेली आहे. तरी देखील संरक्षण राज्यमंत्री यांचा पांझरा चौपाटी पडण्याशी संबंध आहे असा आरोप करणे म्हणजे अज्ञानातला आनंद आहे, असे डॉ़ भामरे यांनी म्हटले आहे़ पांझरा चौपाटीच्या वादाशी आपला काहीही संबंध नसून या वादात पडण्याचे आपल्याला काहीही कारण नाही़ आपले मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, अमृत योजनेतून आलेल्या पाणीपुरवठा, भूमिगत गटार, रेल्वे स्थानकाचे प्रश्न, शहरातील मुलभूत सोई सुविधांसाठी त्यात गजानन कॉलनीतील संरक्षण भिंत या विकास कामांसाठी प्रयत्न सुरू आहे़ त्यामुळे चौपाटी पाडली, पांझराकाठचे रस्त्यांचे काम थांबविण्यासाठी प्रयत्न केले या आमदारांच्या तथ्यहीन आरोपांकडे दुर्लक्ष करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले आहे़
धुळयातील पांझरा चौपाटीबाबत आमदारांचा आरोप निराधार-डॉ़ सुभाष भामरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:44 AM
जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, न्यायालयाच्या आदेशाने झाली कारवाई
ठळक मुद्दे- आमदारांनी केलेला आरोप म्हणजे अज्ञानातला आनंद- पांझरा चौपाटीशी आपला काडीमात्र संबंध नाही- शहरातील विकास कामांसाठी प्रयत्नशिल