धुळे : महानगरपालिकेतर्फे विविध विकासकामांसाठी दिले जाणारे ठेके घेणा:या ठेकेदारांनी संबंधित कामांवर लावलेल्या मजुरांची माहिती सादर न केल्याने मनपाचे कॅनरा, देना व बँक ऑफ इंडिया बँकेतील खाते गोठविण्याचे आदेश भविष्य निर्वाह निधी विभाग, नाशिकचे आयुक्त जगदीश तांबे यांनी दिले होत़े मात्र मनपाने सोमवारी सर्व माहिती सादर केल्याने बँक खाते सुरू करण्याचे आदेश तांबे यांनी दिल़े महापालिकेच्या बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य विभागाकडून दिल्या जाणा:या ठेक्यांनंतर संबंधित ठेकेदार मजूर लावून कामे पूर्ण करतात़ मात्र मजुरांच्या वेतनावर, भविष्य निर्वाह निधीवर किती खर्च केला याबाबतची माहिती सादर करीत नाही़ त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने याबाबतची विचारणा मनपाला केली होती व 7 सप्टेंबरला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे पत्र दिले होत़े मात्र मनपाचा कोणताही अधिकारी उपस्थित न राहिल्याने आयुक्त जगदीश तांबे यांनी मनपाचे कॅनरा बँक, देना बँक व बँक ऑफ इंडियामधील खात्यावरील आर्थिक व्यवहार पुढील आदेश देईर्पयत स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होत़े 2011 पासून माहिती दडवली मनपाने वेळोवेळी याबाबतची माहिती सादर करणे आवश्यक असतानाही मनपा टाळाटाळ करीत असल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली होती़ यापूर्वी 14 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत आयुक्त तांबे यांनी 2011 पासूनची सर्व माहिती सादर करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार मनपाचे उपायुक्त डॉ़प्रदीप पठारे व आस्थापना विभागप्रमुख क़ेजी़खंदरकर यांनी सोमवारी नाशिक येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात हजेरी लावली होती़ पण त्या वेळी सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती़ या निर्णयामुळे मनपाची बँक खाती पुन्हा सुरू केली जाणार आहेत़ आयुक्तांना होते आदेश सुनावणीसाठी आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांनी स्वत: उपस्थित रहावे, असे आदेश भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी दिले होत़े मात्र आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा करून सविस्तर माहिती सादर करणार असल्याचे स्पष्ट केले होत़े त्यानुसार 2011 पासूनची माहिती संकलित करण्याचे काम सुरू होत़े सोमवारी माहिती सादर केल्यानंतर आयुक्तांनी बँक खाते सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़ तर दुसरीकडे न्यायालयाने अॅक्सीस बँकेतील खाते गोठविण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत़ 2005 मध्ये नाशिकच्या मायक्रोव्हिजन कंपनीला सोलर एनर्जी पॅनलचा ठेका दिला होता़ संबंधित ठेकेदाराचे 25 लाख रुपये मनपाकडे थकीत होत़े याप्रकरणी ठेकेदार न्यायालयात गेल्याने न्यायालयाने अॅक्सीस बँकेला पत्र देऊन मनपाचे खाते गोठविण्याचा आदेश दिला होता़ सदर खाते अजूनही बंद असल्याचे सांगण्यात आल़े मनपाची विविध बँकांमध्ये 11 खाती आहेत़ जोर्पयत याबाबत निर्णय होत नाही, तोर्पयत खाते बंद राहणार आह़े
मनपाचे बँक व्यवहार अखेर सुरळीत!
By admin | Published: September 22, 2015 12:26 AM