आॅनलाइन लोकमतनिजामपूर (जि.धुळे) : शेवाळी-नेत्रंग या राष्टÑीय महामार्गावर असलेल्या जैताणे गावाच्या पुढे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेतर्फे आज खड्डयात झाडे लावून छडवेल-जैताणे रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.शेवाळी-नेत्रंग हा राष्टÑीय महामार्गा निजामपूर, जैताणे, छडवेलमार्गे गुजरातमध्ये जातो. या रस्त्यावर दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र शेवाळी ते निजामपूरदरम्यानचा रस्ता खूप खराब झालेला आहे. बांधकाम विभागातर्फे काही दिवसांपुर्वी खड्डे बुजविण्यासाठी टाकलेला मुरुम पावसात वाहून गेला. रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघात होत आहे. अनेकांना दुखापत झालेली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित विभगााचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्यात झाडाची रोपे लावून रस्त्यावर ठाण मांडल. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने थांबली होती. थोडावेळ हे आंदोलन त्यांनी केले. रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती केली जावी अशी मागणी आंदोलकांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.खड्डयांचे डांबरीकरण करुन रस्ता दुरुस्तीचे काम येत्या १५ दिवसात न झाल्यास साकी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आदोंलन करेल असा इशारा देण्यात आला.यावेळी साक्री तालुका मनसे अध्यक्ष योगेश विट्ठल सोनवणे, तालुका संघटक सचिव ज्ञानेश्वर देवरे, जगदीश सोमवंशी, संजय महाजन, साहेबराव सोंजे, शांतीलाल धनगर, गुलाब सोंजे यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
खड्डयांमध्ये झाड लावून मनसेतर्फे धुळे जिल्ह्यातील जैताणे रस्त्यावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:14 PM