लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चोरी आणि घरफोडीच्या घटना घडत असताना मात्र शुक्रवारी गायीच्या वासरुचीच चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता़ पण, नागरिक आणि वासरुचे मालक यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला़ संतप्त जमावाकडून मात्र वाहनाची तोडफोड झाली़ शहरातील चाळीसगाव रोड भागात असलेल्या शंभर फुटी रोडवर असलेल्या पूर्व हुडको भागात शुक्रवार ४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रस्त्यावर कोणीही नसल्याचे पाहून एक चार चाकी वाहन थांबले़ त्यातून तीन जणांनी वाहनाच्या खाली उतरुन गायीचे वासरु चोरण्याचा प्रयत्न केला़ ही बाब लक्षात येताच आरडा-ओरड सुरू झाली़ गल्लीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता या तिघांनी वाहन सोडून पळ काढला़ गायीचे वासरु चोरीचा प्रयत्न सतर्क नागरिकांनी हाणून पाडला़ वासरु चोरुन घेऊन जाण्यासाठी ज्या वाहनाचा उपयोग करण्यात येणार होता ते एमएच ०६ एएफ ४७८९ क्रमांकाचे वाहनाची संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आली़ यावेळी वातावरण अधिकच गंभीर झाले होते़ या घटनेची माहिती पूर्व हुडको भागात राहणारे दीपक रामकृष्ण वाघ यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिली़ त्यानुसार अज्ञात तीन जणांविरुध्द फिर्याद नोंदविण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तडवी करीत आहेत़
जमावाकडून वाहनाची तोडफोड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:16 AM
लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चोरी आणि घरफोडीच्या घटना घडत असताना मात्र शुक्रवारी गायीच्या वासरुचीच चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता़ पण, नागरिक आणि वासरुचे मालक यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला़ संतप्त जमावाकडून मात्र वाहनाची तोडफोड झाली़ शहरातील चाळीसगाव रोड भागात असलेल्या शंभर फुटी रोडवर असलेल्या पूर्व हुडको भागात शुक्रवार ४ ...
ठळक मुद्देशंभरफुटी रोडवरील घटना वासराची चोरी रोखली