धुळे : महापालिकेच्या पथकांकडून मोबाइल टॉवर्स सील करण्यात आल्यानंतरही नेटवर्क सुरू राहत असून वसुली पथकांमध्ये गोंधळाची स्थिती असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची दखल घेत महापालिकेने बुधवारी मोहाडी येथील मोबाइल टॉवर्सचे मुख्य सर्व्हर तज्ज्ञांच्या मदतीने ‘सील’ केले़ त्यामुळे जिल्ह्यासह परिघातील सुमारे ३०० मोबाइल टॉवर्सवरील सेवा खंडित झाल्याने एकच खळबळ उडाली़ दरम्यान, मोबाइल टॉवर्सची सकाळपासून बंद झालेली सेवा दुपारी एयरलिंकद्वारे तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आली असली तरी मुख्य सर्व्हर ‘सील’ असल्याने ती पुन्हा कोलमडण्याची शक्यता आहे़बुधवारी सकाळी कारवाईआयुक्त संगीता धायगुडे यांच्या आदेशाने मनपाचे सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, नारायण सोनार, नंदकुमार बैसाणे, मधुकर निकुंभे यांच्या पथकाने बुधवारी सकाळी मोहाडी येथील इंडस कंपनीचे मुख्य सर्व्हर असलेले टॉवर ‘सील’ केले़ या सर्व्हरवरून विविध मोबाइल कंपन्या मोबाइल नेटवर्क वितरणाची सेवा घेतात़ या कारवाईसाठी औरंगाबाद येथून तज्ज्ञ बोलविण्यात आले होते़ दरम्यान, ही कारवाई होताच काही वेळातच संबंधित टॉवर्सवरून होणारी मोबाइल सेवा खंडित झाली़ त्यामुळे चांगलीच खळबळ माजली होती़दुपारी आयुक्तांकडे बैठकमहापालिकेच्या कारवाईनंतर सर्व मोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मनपात धाव घेतली होती़ प्रत्येक कंपनीकडून आपल्याकडील कर, आक्षेप, आकारणीबाबत विचारणा, तसेच कर भरण्यासाठी मुदत मागण्यात येत होती़ दरम्यान, आयुक्तांनी दुपारी दीड वाजता मोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली़ मात्र, त्यानंतरही सायंकाळपर्यंत कंपन्यांचे प्रतिनिधी मनपात बसूनच होते़मोबाइल सेवा ‘आॅक्सिजन’वऱ़महापालिकेने खंडित केलेली मोबाइल सेवा दुपारी ३ वाजता सुरळीत झाली असली तरी ती एयरलिंकद्वारे सुरू करण्यात आली असून मुख्य सर्व्हर अजूनही सील आहे़ त्यामुळे तात्पुरती सुरू असलेली सेवा केव्हाही कोलमडू शकते, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले़ ‘इंडस’ या मुख्य ‘सर्व्हर’ असलेल्या कंपनीला ४५ लाख रुपयांची कर आकारणी करण्यात आली असून त्यात २८ लाख थकबाकी व १७ लाख नियमित कराचा समावेश आहे़ शहरातील एकूण १२५ मोबाइल टॉवर्सपोटी कंपन्यांकडे अडीच कोटी रूपये कर थकीत असून त्यापैकी ७० ते ८० लाख रूपये आतापर्यंत वसुल झाले आहेत़ मनपाच्या कारवाईमुळे मोबाइल कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत़‘एयरलिंक’द्वारे मोबाइल सेवा सुरू़़़महापालिकेने केलेल्या मोहाडीतील मुख्य टॉवरवरील कारवाईमुळे धुळे शहर व जिल्हा, जळगाव, नंदुरबार, इंदूरपर्यंतच्या महामार्गांवरील व ग्रामीण भागातील ३०० पेक्षा अधिक मोबाइल टॉवर्सची सेवा खंडित झाली होती़ त्यात एयरटेल, व्होडाफोन, आयडिया, युनिनॉर, टाटा, बीएसएनएलच्या कंपन्यांच्या सेवेचा समावेश होता़ सकाळी खंडित झालेली सेवा दुपारी ३ वाजता सुरळीत झाली़ दरम्यान, मुख्य सर्व्हर सील असताना सेवा सुरू कशी झाली, याची पडताळणी महापालिकेने केली असता एयरलिंक या ‘इमर्जन्सी लिंकिंग’द्वारे सेवा सुरू झाल्याचे समोर आले़
मोबाइल सेवा ‘आॅक्सिजन’वर!
By admin | Published: March 23, 2017 12:07 AM