शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पारंपरिक नृत्याविष्कारांची रसिकांवर मोहिनी

By admin | Published: January 06, 2017 7:55 PM

एका पेक्षा एक सादर होत असलेले नृत्याविष्काराला मिळालेली दाद. त्यातून निर्माण झालेल्या चैतन्यमय वातावरणात येथे उत्तरोत्तर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तरुणाईने पारंपरिक

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 6 -  एका पेक्षा एक सादर होत असलेले नृत्याविष्काराला मिळालेली दाद. त्यातून निर्माण झालेल्या चैतन्यमय वातावरणात येथे उत्तरोत्तर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तरुणाईने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करत या नृत्याविष्काराची रसिकांवर मोहिनी टाकली. निमित्त होते, स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे सरकारसाहेब रावल यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘जय लोकोत्सव’ या कार्यक्रमाचे. दरम्यान, यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिंदखेडा तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त  आज सकाळी हा कार्यक्रम दादासाहेब रावल नॉलेज सिटीत झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नयनकुवर रावल होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मंचावर शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख, सी. एन. राजपूत, के. एम. अग्रवाल, ईश्वर भावसार, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नारायण पाटील, आर. टी. गिरासे, दोंडाईचा पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे, कार्यक्रम संयोजक प्राचार्य एन. ओ. गिरासे, उपप्राचार्य के. डी. गिरासे, सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. पाटील, डी. एन. जाधव, एस. बी. गिरासे, बी. एस. रावल उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस. बी. राजपूत यांनी केले. परीक्षक म्हणून परीक्षक म्हणून सिद्धार्थ बागुल, किशोर शिरसाठ, सागर आठवलं, सोमनाथ शिंपी यांनी केले.१२८ स्पर्धकांनी घेतला सहभाग शिंदखेडा तालुका व दोंडाईचा शहरातील विविध शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील १२८ स्पर्धकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दादासाहेब रावल महाविद्यालयातील पूजा गिरासे या विद्यार्थिनीने ‘सत्यम शिवम सुंदरा’हे गीत सादर करून वातावरणात रंगत आणली. यानंतर विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, जोगवा, भांगडा, लावणी, देशभक्तीपगर गीने, अहिराणी गीतांवर ठेका धरत येथे आयोजित कार्यक्रम उत्तरोत्तर रंगविला.नाटिकेतून दिला स्त्री-भ्रूणहत्त्या रोखण्याचा संदेश दोंडाईचा शहरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘नन्निशी चिडीया’ या विषयावर नाटीका सदार करून स्त्री-भ्रूणहत्त्या रोखण्याचा संदेश दिला.