लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आरडीचा फॉर्म देण्याचा बहाणा करुन एका आठ वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी शहरात घडली़ याप्रकरणी शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले़ शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील वैभव नगरातील अथर्व अपार्टमेंटमध्ये राहणाºया महिलेने शहर पोलिसात गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, आरडीचा फॉर्म देण्याचा बहाणा करुन मुलीला घरात बोलाविले़ तिचा विनयभंग करण्यात आला़ या घटना समजल्यानंतर लागलीच त्याचा जाब विचारण्यासाठी गेली असता मला अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली़ गालावर चापट मारुन जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली़ ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास स्वामी अपार्टमेंटमधील एका घरात घडली़ याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३५४ (अ), ३२३, ५०४, ५०६ सह बालकांचे लैंगिेक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन २०१२ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़ घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक एच़ जे़ जाधव करीत आहेत़ दरम्यान, रात्रीच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आणि स्वप्निल परदेशी (पूर्ण नाव माहित नाही) याला शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास संशयावरुन ताब्यात घेतले आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत़
आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग, एक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:40 PM
धुळे शहर : पोलिसात गुन्हा दाखल
ठळक मुद्देमुलीच्या मातेची पोलिसांकडे धावशहरातील एका अपार्टमेंटमधील घटना पोलिसांच्या तपासाअंती पहाटेच संशयित ताब्यात