धुळे : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाने सोमवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे़ वसुलीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी धडक कारवाई सुरु करण्यात येणार आहे. त्यात मालमत्ता जप्ती आणि नळ जोडणी कनेक्शन बंद करण्यात येणार आहे.महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत म्हणून मालमत्ता कराकडे पाहिले जाते़ १ एप्रिल २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१९ या आर्थिक वर्षात महापालिका कर विभागाकडे ३ कोटी ३१ लाखांची पाणीपट्टी कर वसुली झाली आहे़ गेल्या वर्षाप्रमाणे चालू वर्षीही मालमत्ता कर वसुलीचे लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंबर कसली आहे़ त्यासाठी आयुक्त अजिज शेख यांनी संबधित विभागाला धडक मोहीम राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत़ बड्या थकबाकीदारांना यासंदर्भात नोटीसा बजावून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणणे़, नळजोडणी खंडित करणे या स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे़नळ जोडणीसाठी पाच हजार दंडथकबाकी भरण्यासाठी मनपा मालमत्ता कर विभागाने थकीत १३ हजार मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या़ त्यापैकी सहा ते सात हजार थकबाकीधारकांनी कर भरण्यासाठी लोकअदालतीत गर्दी केली होती़ मात्र नोटीसा व आवाहन करून देखील थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना आता पाच हजार रूपये दंड भरावा लागणार आहे़ सोमवार पासून कारवाईची मोहीम राबविली जाईल.दोन हजारांपासून थकबाकीशहरासह हद्दवाढीतील मालमत्ता धारकांवर दोन हजार रूपयांपर्यत थकबाकीची रक्कम असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे़ २०१८-१९ या आर्थिक वर्षाची ३ कोटी ३१ लाखांची थकबाकी वसुल झाली आहे़ तर उर्वरित १४ कोटी २१ लाखांची वसुली होण्यासाठी कारवाई केली जाणार आहे़अन्यथा २ टक्के दंडथकीत रक्कम भरण्यासाठी लोकअदालतीची संधी उपलब्ध करून दिली होती़ तरी देखील मालमत्ता कर न भरणाºया भरलेल्या रक्कमेवर दरमहा २ टक्के कर लावण्यात येणार आाहे़बॅनर्सद्वारे जनजागृतीवर भरमनपाकडून एलबीटी व मालमत्ता कर भरण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे़ लोकअदालतीनंतर थकबाकीधारकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी शहरात बॅनर लावून जनजागृती केली जाणार आहे़त्यामुळे शंभर टक्के उदिष्ट पूर्ण करण्याचा पथक नियुक्त करण्यात आले आहे़
‘त्या’ मालमत्ताधारकांवर सोमवारपासून संक्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 9:53 PM