लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पोलीस प्रशासनातील रिक्त पदांबाबत वेळोवेळी चर्चा होत आली आहे़ रिक्त पदांचा ताण अन्य कर्मचारी आणि अधिकाºयांवर येत असल्याचे सर्वश्रृत आहे़ सद्यस्थितीत पोलीस उपनिरीक्षकांच्या ९० जागा मंजूर असताना मात्र केवळ ५५ अधिकारी कार्यरत आहेत़ परिणामी ३५ जागा या अद्यापही रिक्त असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे़ जिल्ह्यात सध्या १७ पोलीस ठाणे असून आणखी चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. जास्त लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाण हे निकष लावून हे प्रस्ताव पाठविले आहेत़ त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रिक्तपदाचा प्रश्न वेळीच सुटणे गरजेचे आहे़ धुळे शहराचा विस्तार वाढत असून कायदा सुव्यवस्थेच्या जबाबदारीतही वाढ होत आहे. त्यामुळे शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत दोन वर्षापूर्वीच गृह विभागाला प्रस्ताव दिला आहे. किमान शहरातील जी संवेदनशील ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत तरी निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी जिल्हा नियोजन विकास समितीकडे करण्यात आली आहे. विविध कारणांमुळे समाजात तणाव (सोशल टेन्शन) निर्माण होतो. ते जाणवले की ते कसे कमी करायचे, स्थिती हाताबाहेर गेली ती नियंत्रणात कशी आणायची, याचा पोलीस दलातर्फे सतत विचार सुरू असतो. त्यासाठी साम, दाम, दंड व भेद असे सर्व मार्ग अवलंबवावे लागतात. गुन्ह्यांच्या जगात डोकावले तर बहुतांश वेळा आरोपी तेच असतात. गुन्हे करणे हेच त्यांचे काम असते. तर या संदर्भात पोलीस अधिकाºयांनी वेळीच लक्ष देवून हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत़ अशा आरोपींवर परिणामकारक कारवाई करून त्यांच्यावर वचक कसा ठेवायचा, आणि त्यातून गुन्ह्यांचे प्रमाण कमी करायचे, यावर प्रामुख्याने अधिकाºयांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे़
धुळ्यात रिक्त पदांमध्ये उपनिरीक्षकांचा भरणा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 3:54 PM
जिल्हा पोलीस प्रशासन : गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान, शासनाकडे पाठपुरावा अपेक्षित
ठळक मुद्देपोलीस विभागात उपनिरीक्षक दर्जाची सर्वाधिक पदे रिक्त असल्याने स्वाभाविकच त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा इतरांवर येत आहे़ त्याचा परिणाम तपास कामावर होत आहे़ शासनदरबारी वारंवार मागणी नोंदविण्यात आली आहे़ पण त्याचा फारसा उपयोग होत नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे़ लवकरात लवकर रिक्त जागा भरल्या जातील, असे सांगण्यात येत आहे़