ऑनलाइन लोकमतकापडणे, जि. धुळे, दि. 19 - धुळे तालुक्यातील सोनगीर गाव परिसरातील डोंगर फोडून अवैध व चोरटय़ा मार्गाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने गौण खनिजाची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मात्र याकडे प्रशासनातील अधिका:यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सोनगीर येथील पोलीस स्टेशनच्या मागे मोठा डोंगर आहे. तेथून दगड, मुरूम, मातीची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. दोन ते तीन ट्रॅक्टर व जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने येथील गौण खनिज नैसर्गिक साधन संपत्तीची वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने येथील सर्वच डोंगर फोडले जात आहेत. मिळेल त्या वाहनाने येथील डोंगराचा फोडलेला मुरुम काढून दिवसा शासकीय मालमत्तेची चोरी केली जात आहेत.घटनास्थळी एक जे.सी.बी. मशिन डोंगर फोडून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत मुरूम भरण्याचे काम करीत होते. या वेळेस येथे दोन ते तीन ट्रॅक्टरही मुरुम भरण्यासाठी होते. मात्र, यातील एकाही ट्रॅक्टर व ट्रॉलीला नंबर प्लेटा नव्हत्या. चालकांचादेखील चेहरा ओळखता येऊ, नये म्हणून केवळ डोळयाने दिसेल ऐवढाच भाग मोकळा ठेवत तोंडावर संपूर्ण रुमाल बांधलेला दिसत होता. सर्वच डोंगर पोखरले गेले तर पर्यावरणाचा मोठा :हास होणार आहे. याचा विपरीत परिणाम म्हणून पर्यावरणीय जैवविविधतेची साखळीच नष्ट होऊन व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नुकसानीचे परिणाम सर्वानाच भोगावे लागणार आहेत. डोंगर नष्ट झाल्यामुळे येथील मृदेची धूप होवून मृदा देखील कमी होईल. डोंगरांमुळे निसर्गाचे पावसाळी पाणी अडवण्यास फायदा होतो व नदी नाल्यांना पाणी येवून लहान मोठी धरणेही या डोंगरांमुळे भरले जात असतात. डोंगर असल्यामुळे जमिनीत पाणी मुरले जाते व जमिनीत पाण्याची पातळी टीकवून ठेवण्यास मदत होते. पाणी टंचाईशी सामना करण्यास डोंगरांमुळे फायदाच होत असतो. 2 ते 31 मेपयर्ंत मी रजेवर आहे म्हणून मी काही कार्यवाही करू शकत नाही. एक ट्रॅक्टरला दंड म्हणून सात हजार 400 रुपये याप्रमाणे सरकारी दंड आकारला जाऊ शकतो व संबंधितांवर तसेच जे.सी.बी. चालक, मालकावरदेखील चौकशी करून गंभीर गुन्हे दाखल करता येतील, असे मंडळ अधिकारी डिगंबर आर. ठाकूर यांनी सांगितले.
गौण खनिजासाठी पोखरले जाताय डोंगर
By admin | Published: May 19, 2017 5:49 PM