लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कांद्याला २ हजार ३०० रुपये हमी भाव मिळावा, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी केेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्या धुळ्यातील कार्यालयासमोर कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन केले़ लक्षवेधी ठरलेल्या आंदोलनाची दिवसभर चर्चा होती़ यावेळी आंदोलनकर्त्यांपैकी काहींनी आपल्या गळ्यात कांद्याच्या माळा घालून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला़ तर रस्त्यावर कांदा ओतून शेतकºयांच्या संतप्त भावनाही यावेळी मांडण्यात आल्या़ केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने कांदा उत्पादक शेतकºयांवर अन्याय होत आहे़ उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन करणाºया सरकारने प्रत्यक्षात मात्र शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत़ आता जरी सरकारने २०० रुपये प्रति क्विंटल देण्याची घोषणा केली असलीतरी ती मिळणारी मदत तुटपूंजी आहे़ हा शेतकºयांवर अन्याय असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ शेतकºयांना किमान २ हजार ३०० रुपयांचा भाव मिळायला पाहीजे, अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात राज्य कार्यकारीणी सदस्य साहेबराव मोरे, सुधाकर मोगूल, सोमनाथ बोराडे, नाना बच्छाव, नितीन देठे पाटील, शरद लभडे, मनोज भारती, सचिन कड, प्रकाश चव्हाण, भाऊसाहेब तासकर, काशिनाथ वागदरे, प्रशांत पाटील, मंगेश बावस्कर, रामदास गवळी, हिरामण पुंढे, भूषण मासुळे आदींनी सहभाग नोंदविला होता़
धुळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 4:33 PM
स्वाभिमानी शेतकरी संघटना : कांद्याला हमी भाव मिळण्याची मागणी कायम
ठळक मुद्देकांद्याला हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमककेंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन