धुळे : जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी न्याय मिळण्यासाठी व दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विखरण (ता. शिंदखेडा) येथे टॉवरवर चढून उपोषण सुरू केले आहे. दोषींवर कारवाई न झाल्याने मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेपासून त्यांनी आंदोलन सुरू केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठविला आहे.पाटील यांच्या आत्महत्येस एक वर्ष होत आहे. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देणारे आणि मध्यस्थी करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अपयशी ठरले आहेत. सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे पत्रात म्हटले आहे.खाली येण्यास नकारअपर तहसीलदार उल्हास देवरे व इतर अधिकाऱ्यांनी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र त्यांनी खाली येण्यास नकार दिला.
धर्मा पाटलांच्या मुलाचे टॉवरवर चढून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 05:29 IST