धुळे, दि. 1- सरदार सरोवरातील सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आल़े अजूनही या प्रकल्पातील शेकडो 400 ते 500 कुटुंबांचे पुनर्वसन बाकी आह़े त्यामुळे राज्यात कायदा असूनही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. आदिवासींचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे जिल्हाधिका:यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली़ आंदोलनात नितीन माने, विजय महाले, अॅड़ मधुकर भिसे, विनोद पगार, सुनील दुसाणे, अरविंद कपोले, अॅड़ मिलिंद बोरसे, भैय्यासाहेब पाटील, अश्पाक खाटीक, नुरा शेख, प्रा़ श्याम पाटील, अनिल देवपूरकर, दत्ता बागूल, माधव गुरव, कृष्णा शिरसाठ, नवल ठाकरे सहभागी झाले होत़े
धुळ्य़ात सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आंदोलन
By admin | Published: April 01, 2017 6:36 PM