जुने जिल्हा रुग्णालय : बांधकाम विभागाचे काम मार्गी, रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी वाढली
धुळे, दि.12 - अखेर शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम आराखडा परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले असून त्यात काही दुरुस्त्या आणि नव्याने इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करावे लागणार असल्याचे सूचित केलेले आह़े जिल्हा रूग्णालयाचे चक्करबर्डीला स्थलांतर झाल्यापासून शहराच्या मध्यवर्ती भागातील ही इमारत बांधकाम आराखडा परीक्षणा अभावी अक्षरश: धूळ खत पडून होती. तिचा वापर झाला पाहिजे यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता़
या जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचे सामान्य रुग्णालय कार्यरत करण्यासाठी 5 एप्रिल 2017 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, जिल्हा शल्य चिकित्सक एम़पी़ सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एस़एम़ शिंदे आणि शाखा अभियंता एस़एस़ देवरे यांनी जुन्या रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली होती परंतु इमारतीअभावी ते सुरू होऊ शकत नव्हते.
त्यानुसार 2 जानेवारी 2017 मध्ये 307 पदांना मंजुरी मिळाली आह़े इमारतीचा वापर करण्यासंदर्भात बांधकाम परीक्षणासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़संजय शिंदे यांनी स्पष्ट केले होत़े शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परीक्षण केले जाईल़
नंतर त्याचा वापर होईल, असेही ते म्हणाले होत़े त्यानंतर 25 मार्च 2017 रोजी रुग्णालय प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकाम परीक्षणाबाबत पत्र देण्यात आलेले होत़े